मस्तानीची इच्छा रणवीरने केली पूर्ण; शाहरुखच्या मन्नत शेजारी घेतलं घर; किंमत पाहून धक्काच बसेल

दिल्ली | बॉलिवूडचे लोकप्रिय आणि पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आता लवकरच शाहरुख खान आणि सलमान खानचे शेजारी बनणार आहेत. रणवीर सिंगने सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.

या घरातून त्यांना बँडस्टँडवरून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. रणवीर – दीपिकाचे हे नवीन घर नेमके कसे आहे? त्याची किंमत किती आहे? क्षेत्रफळ किती आहे या सर्वच प्रश्नांची उत्तरे या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

रणवीर सिंगने नुकतेच आपल्या स्वप्नात एक नवीन घर घेतले आहे. त्याने जिथे घर घेतले आहे तेथील अपार्टमेंटचे काम अद्याप संपूर्ण झालेले नाही. काम अजून सुरूच आहे. मात्र त्याने जी अपार्टमेंट बुक केली आहे तिथून आरबी समुद्राचे दृश्य अगदी स्पष्ट दिसते. आपल्या घरातून अगदी समुद्र किनाऱ्याचा आनंद घेता यावा यापेक्षा आणखी मोठ सुख कोणतं. चाहते या दोघांनी नवीन घर घेतल्याने खूप आनंदी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रणवीरने हे घर तब्बल ११९ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

यामध्ये विशेष बाब म्हणजे ही अपार्टमेंट शाहरुख खानच्या मन्नत आणि सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये येतो. बांधण्यात येत असलेल्या टॉवरच्या १६ व्या, ते १९व्या मजल्यावर त्याच्या घराचे बांधकाम होत आहे. त्याच्या घराचे एकूण चटईक्षेत्र ११२६६ चौरस फूट आणि एक विशेष टेरेस १३००चौरस फूट एव्हढे आहे. रणवीरला या घरासोबत १९ पार्किंग एरिया देखील दिले आहेत.

मालमत्तेच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर त्या भागात प्रति चौरस फुटाचा दर एक लाख रुपये आहे. रणवीरने हे घर ओह फाइव्ह मीडिया वर्क्स एलएलपीच्या माध्यमातून विकत घेतले आहे. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला ७.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्कही भरले अशी माहिती समोर येत आहे.

रणबीरच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाले तर, रणवीर नुकताच जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. तसेच, त्याचा Man Vs Wild with Bear Grylls चा भाग देखील अलीकडे प्रसारित झाला आहे.

रोहित शेट्टीच्या सर्कस या आगामी चित्रपटात रणबीर दिसणार आहे. त्याचबरोबर करण जोहरच्या रॉकी ओर राणीकी लव्हस्टोरी हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच कॉफी विथ करण या शोमध्ये तो या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *