दारा सिंग यांनी 200 किलो वजन असलेल्या किंग कॉंगला एका झटक्यात हाणून पाडले; आणि हनुमान होऊन आख्या भारतावर राज्य केले!

मुंबई | अभिनयातील बादशाह म्हणावं की, हिंदू समाजाचे कट्टर भक्त दारा सिंग हे त्यांच्या जमण्याचे एक कुशल अभिनेते आणि रेस्लर राहिले आहेत. दारा सिंह यांची काल 10वी पुण्यतिथी होती. दारा सिंग हे एक असे रेस्लर होते ज्यांनी त्यांच्या काळात सर्वच स्पर्धकांना हाणून पाडले होते.

ते एक असे रेस्लर होते ज्यांनी आयुष्यात एकही मॅच हारली नाही. त्यांच्या काळातील सर्च रेस्लरना त्यांनी हरवले होते. ते जेव्हा रेस्लिंगमध्ये होते तेव्हाही एक उत्तम खेळाडू म्हणून लोकप्रिय राहिले आणि अभिनयात देखील त्यांनी आपले पाय भक्कम रोवले होते. 200 किलो वजन असलेल्या किंग कॉंगचा पराभव करणाऱ्या दारा सिंग यांनी 10 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली होती.

त्यांनी राष्ट्रकुल, जागतिक कुस्ती, मलेशियाचे चॅम्पियन असे जेतेपदही पटकावले होते. सुमारे 500 कुस्ती सामने खेळलेल्या दारा यांनी एकही सामना गमावला नाही. साल 1996 मध्ये हॉल ऑफ फेम आणि 2018 मध्ये WWE हॉल ऑफ फेम देखील मिळाले होते.

1983 मध्ये दारा सिंग यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर त्यांनी 1952 मध्ये आलेल्या ‘संगदिल’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात एंट्री घेतली. दारा यांनी काही वर्षे स्टंट अभिनेता म्हणून काम केले. नंतर त्यांना 1962 मध्ये आलेल्या बाबूभाई मिस्त्रीच्या किंग कॉंग चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली.

साल 1962 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला बी ग्रेड श्रेणी मिळाली होती. यानंतर दारा सिंह आणि मुमताजच्या जोडीने सलग 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. हे सर्व चित्रपट बी ग्रेड होते आणि दरा यांना प्रत्येक चित्रपटासाठी ४ लाख रुपये एवढे मानधन मिळत होते. साल 1980 मध्ये रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक मालिका रामायणमध्ये सातत्याने बी ग्रेड चित्रपट करणाऱ्या दारा सिंह यांना लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना खरा रामभक्त हनुमान मानले.

हनुमानाची भूमिका त्यांनी अगदी हुबेहूब साकारली होते. आजही हनुमान म्हणून त्यांची प्रतिमा अनेकांना आठवते. यानंतर दारा अनेक पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांमध्ये दिसले. त्यांनी राकेश खन्ना यांच्या बरोबर देखील स्क्रीन शेअर केली होती. आनंद या चित्रपटात दारा राजेश खन्ना यांचे कुस्ती गुरू बनले होते. इतर कलाकारांप्रमाणे त्यांनी देखील दोन लग्न केली. दोन्ही पत्निंकडून त्यांना एकूण ६ आपत्ये झाली.

‘दिल अपना पंजाबी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. राजकीय वर्तुळात देखील त्यांनी आपले नशीब आजमावले आणि राज्यसभेवर निवडून आलेले ते पाहिले खेळाडू ठरले. दारा 2003 ते 2009 पर्यंत खासदार राहिले आहेत.

अशात 7 जुलै 2012 रोजी दारा सिंग यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान असे आढळून आले की मेंदूमधून रक्त गळतीमुळे त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होत आहे. तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नाही हे समजल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर १२ जुलै २०१२ रोजी त्यांनी या जगाला अलविदा केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *