दक्षिणात्य अभिनेता विक्रम रुग्णालयात दाखल; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

दिल्ली | दक्षिणात्य अभिनय क्षेत्राला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेता चीनाय विक्रम याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विक्रम हा प्रसिध्द अभिनेता आहे. त्याने शेकडो चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना सध्या मोठा धक्का बसला आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानतंर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या त्याची प्रकृती सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

त्यामुळे विक्रमच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गेल्या काही दिवसापासून त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. त्याला अनेक दिवसांपासून ताप येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र याबाबत डॉक्टरांनी विशेष घोषणा केली नाही. तर दबक्या आवाजात त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचे देखील बोललं जात आहे. त्यामुळे चाहत्यांना थोडी चिंता वाटू लागली आहे. मात्र डॉक्टरांनी असे काहीही झाले नसल्याची माहिती दिली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *