लॉकडाउन असूनही या किरकोळ विक्रेत्यांनी कमवले बक्कळ पैसे

मुंबई | नोकरी पेक्षा एक व्यवसायिक अधिक पैसे कमवतो असं अनेक जाणकार सांगतात. याचीच प्रचिती कोरोना काळात देखील आली. कोरोना महामारिमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सर्व काही ठप्प झाले होते.

लॉकडाऊन लागल्याने सर्व गोष्टी बंद होत्या. अगदी मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन देखील या काळात बंद होती. व्यवसायांवर देखील याचा परिणाम झाला होता. मात्र जे स्थानिक व्यावसायिक होते त्यांना मात्र याची झळ थोडी कमी लागली. अर्थातच त्यांचं रोजच हातावरच पोट होतं.

भाजी, जेवण, धान्य, कपडे, विजेची वेगवेगळी उपकरणे असे अनेक व्यवसायिक या काळात मोठ्या मुश्किलीने आपला उदरनिर्वाह करत होते.

अनेकांनी सुरुवातीला उपासमारी देखील सहन केली. मात्र पोटातली भूक शांत करण्यासाठी काही तरी हात पाय हलवावेच लागणार. तर या कठीण काळात अनेक व्यावसायिकांना साथ मिळाली ती ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाची.

या माध्यमातून अनेक स्थानिक व्यावसायिकांनी पैसे कमवले आणि आपला उदरनिर्वाह केला. कोरोना महामारीत काही वादळे देखील आली होती. त्यामुळे देखील अनेक व्यक्तींचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या काळात अगदी ज्यांच्या हातातली नोकरी गेली आहे. त्या व्यक्ती देखील व्यवसाय करू लागल्या.

अनेक जणांनी भाजी पाला विकण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या मालाची माहिती प्रसारित केली. इंस्टाग्राम आणि व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला.

कोरोनानंतर पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने या विषयावर संशोधन केले. तेव्हा तिला समजले की, लॉकडाऊनचा काळ अनेकांना खूप काही शिकवून गेला. यावेळी फक्त भाजी पाला विक्रेत्यांनी सोशल मीडियाचा वापर केला नाही तर, अगदी कपडे आणि विजेच्या वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकांनी देखील याचा वापर केला.

इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांनी या काळात माल असाच पडून खराब होण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तींना त्याचे फोटो आणि माहिती देऊन कमी पैशांमध्ये विकला. अशात यामुळे अगदी गरीब भाजी विक्रेता ज्याने कधी सोशल मीडिया पाहिलं नव्हतं किंवा त्याचा असा वापर होईल असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांनी देखील सोशल मीडियाचा वापर केला.

त्या विद्यार्थीनीने काही लोकांची मुलाखत घेऊन त्यांचा ऑनलाईन भाजी आणि इतर गोष्टी खरेदीचा अनुभव देखील जाणून घेतला. त्यावेळी असं समजलं की, अनेकजण अशा पद्धतीने खरेदी करण्यास अधिक पसंती देत आहेत.

अगदी रोजची लागणारी भाजी आणि खाण्या पिण्याच्या काही वास्तू खरेदीसाठी बाहेर न पडता अशा पद्धतीने मिळतात हे अनेक ग्राहकांना पसंत होतं. अनेकांनी अनलॉक झाल्यावर देखील अशा प्रकारे खरेदी करणे पसंत केलं आहे. सांगायचा मुद्दा असा की, सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जिथे फक्त विरंगुळा नाही तर पैसे देखील कमावले जाऊ शकतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *