शुटींग दरम्यान झाले जवळच्या व्यक्तीचे निधन; आदीतीची कहाणी ऐकून तुम्हालाही होतील अश्रू अनावर….

मुंबई | वेब सिरिजच्या दुनियेत सध्या “शी” ही वेबसिरीज खूप चर्चेत आहे. सलग दोन सीजन हिट झाल्यानंतर आता प्रेक्षकांना याच्या तिसऱ्या सीजनचे वेध लागले आहे. कधी एकदा या सिरीजचा तिसरा सीजन येत आहे याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

कलाकार आणि त्यांचं आयुष्य हे नेहमीच एक मोठी तारेवरची करत असते. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी, आपल्या मनाची समजूत घालत कलाकार दमदार अभिनय करत असतात. या सिरीजमध्ये भूमिका हे पात्र अभिनेत्री आदिती पोहनकर साकारत आहे.

तिच्या दमदार अभिनयाने ही सिरीज आज भारत नाही तर अमेरिका आणि लंडन सारख्या अनेक देशांमध्ये चालत आहे. तसेच याचा प्रेक्षक वर्ग हा अगदी लहान मुलांपासून मोठ्यंपर्यंतचा आहे. यामध्ये आदितीची मेहनत खरोखर खूप जास्त आहे. नुकतीच तिने एका माध्यमाला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील एक मोठा खडतर प्रसंग सांगितला. तिचा हा प्रसंग ऐकून कदाचित तुम्हाला ही अश्रू अनावर होतील.

मुलाखतीत तिने सांगितलं की, ” या सिरीजच्या शुटींग मध्ये मी भूमी हे पात्र साकारत होते. या शोची शूटिंग जवळपास नऊ महिने सुरू होती. त्याच दरम्यान माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मी आतून पूर्णतः खचले होते. मात्र याचा माझ्या कामावर मला काहीच परिणाम होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे मी जिद्दीने पुन्हा एकदा उभी राहिले. सर्व शुटींग मी पूर्ण केलं.”

एवढी हिम्मत ती कशी काय केली असा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की, ” हे सर्व खरोखर माझ्यासाठी खूप कठीण होते. तो काळ खूप विचित्र आणि भयानक होता. मात्र याची हिम्मत मला माझ्या बाबांकडूनच मिळाली.

ज्यावेळी ते अखेरचा श्वास घेत होते तेव्हा तेच मला म्हणाले की, ” मला माहित आहे हे तुझ्यासाठी कठीण आहे. मात्र तू खूप धीट आणि स्ट्राँग मुलगी आहेस. तू हार नाही मानायची.” बाबांचे हे शब्द मी सत्यात उतरवले. त्यांनी मला जसे सांगितले मी अगदी तसेच केले. त्यांच्यामुळेच माझ्यात एवढं मोठं बाळ आलं.”

तसेच पुढे भूमी या पात्राचा तुझ्या आयुष्यात काही परिणाम झाला का ? असे विचारल्यावर तिने सांगितले की, ” हो कारण भूमी हे पात्र खरोखर खूप कठीण आहे. मार प्रत्येक कलाकाराला अशा आव्हानात्मक भूमिका कराव्या लगतात.

भूमी साकारत असताना अनेकदा मला त्या पत्रातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागायचा. मी विसरून जायचे की मी कोण आहे. मी हळुहळू अगदी भूमी सारखीच वागू लागले होते. मी तिच्या सारखीच बोलू लागले होते. या पात्राचा माझ्यावर खूप प्रभाव होता.”

आदिती ही अभिनेत्री सर्व प्रथम एका मराठी चित्रपटात झळकली होती. रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटात तिची विरोधी भूमिका होती. या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाहिले पाऊल ठेवले होते. तर आता तिच्या शी या सिरीज मुळे ती भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *