बहुप्रतीक्षित ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ मधील केट विन्सलेटचा फस्ट लूक आला समोर…

दिल्ली | अवतार हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून चाहते याच्या सिक्वलची वाट पाहात आहेत. अशात आता लवकरच या चित्रपटाचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा सिक्वल चाहत्यांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी याचा ट्रेलर रिलीज झाला होता. अशात आता यातील अभिनेत्री केट विन्सलेटचा फस्ट लूक समोर आला आहे.

यामध्ये केटला पाहून सगळेच पुन्हा एकदा चकित झाले आहेत. तिचा फस्टलूक एम्पायर मॅगझिनच्या कवर पेजवर दिसला आहे. यामध्ये केट पाण्यामध्ये आहे. विखुरलेले केस त्यात लांब लचक वेणी आणि अजप प्रकारचे कान असलेल्या केट जवळ पाण्यातील मासे असा हा फोटो आहे. तिचा हा लूक आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

चाहत्यांमध्ये आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केटचा हा लूक पाहून चित्रपट किती रंजक असेल हे समजते. जेम्स कॅमेरून यांनी मे महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. त्यावेळी त्यातून या चित्रपटाची छोटी झलक पाहायला मिळाली. केट देखील ट्रेलरमध्ये दिसली होती. मात्र तिच्या लूक विषयी काहीच दाखवण्यात आलं नव्हतं.

अवतार द वे ऑफ वॉटर या चित्रपटात केट विन्सलेट रोनल हे पात्र साकारताना दिसेल. साल २००९ मध्ये अवतार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अतिशय ॲनिमेशन आणि व्हिएफएक्सचा भडिमार असलेला हा चित्रपट त्या काळी सर्वांनाच खूप अद्भुत वाटला. त्यानंतर आता तब्बल १३ वर्षांनी याचा सिक्वल येत आहे. यावेळी अवतार चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हाच त्याच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली होती. मात्र जेम्स कॅमेरॉन यांनी यासाठी बराच काळ घेतला.

अशात अवतार द वे ऑफ वॉटर असं या चित्रपटाच नाव असल्याने आपल्याला समजते की, चित्रपट पूर्णतः अंडर वॉटर असणार आहे. केटने एका मुलाखतीत सांगितले होते की, या चित्रपटामुळे बराच काळ पाण्यात श्वास रोखून धरायला मी शिकले आहे. चित्रपटात केट व्यतिरिक्त सॅम वर्थिंग्टन, जो सालडाना, स्टीफन लँग, मिशेल रॉड्रिग्ज हे कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत. जेम्स कॅमेरॉन यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *