पत्नी असून देखील अशोक सराफ यांना ‘या’ अभिनेत्रीचा आवडायचा….

मुंबई | अशोक मामा आणि रंजना ही जोडी मराठी चित्रपट सृष्टीत चांगलीच गाजली होती. या दोघांनी एकत्र अनेक विनोदी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या भूमिका आजही आठवल्या की चेहऱ्यावर हसू येते. अशात अशोक सराफ यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना रंजना यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यावेळी त्यांना पत्नी निवेदिता जास्त आवडायची असं ते म्हणाले होते.

अशोक सराफ यांनी तर मराठी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे. त्यांनी जेवढ्या विनोदी भूमिका साकारल्या आहेत तितक्याच गंभीर भूमिका देखील लीलया पार पडल्यात. अशात त्यांची पत्नी निवेदिता सराफ या देखील मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठ्या अभिनेत्री होत्या. मात्र आपल्या पत्नी पेक्षा अशोक यांना रंजना यांचा अभिनय आवडायचा.

ते मुलाखतीत म्हणाले होते की, ” रंजनाने सुरुवातीला अनेक गंभीर भूमिका केल्या आहेत. अशात पहिल्यांदाच तिने माझ्या बरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यावेळी आमची दोघांची विनोदी भूमिका होती. त्यावेळी रंजनाच विशेष कौतुक केलं जातं होतं. तिचा चाहता वर्ग माझ्याहून अधिक वाढला होता. लोक मला सांगायचे ती अभिनयात तुझ्यापेक्षा भारी ठरत आहे. यावेळी मला छान वाटायचे. कारण ती खरोखर उत्तम अभिनय करायची.”

तसेच पुढे ते म्हणाले की, ” रंजनाला कोणतीही भूमिका दिली तरी ती त्या भूमिका उत्तम साकारायची. तिचा अभिनय हरहुन्नरी होता. त्यामुळे तिच्या आधी आणि तिच्या नंतर देखील अनेक अभिनेत्रींबरोबर मी काम केलं. मात्र तिच्या सारखा अभिनय मला इतर कुणाचा दिसला नाही.” असं अशोक सराफ म्हणाले. मंडळी ज्यावेळी अशोक सराफ आणि रंजना एकत्र काम करत होते तेव्हा त्यांच्या विषयी अनेक वेगवेगळ्या चर्चा कानी येत होत्या.

अशोक मामा आणि रंजना यांचा बिन कामाचा नवरा हा चित्रपट खूपच विनोदी होता. यात एकदम भारी म्हणजे त्यांचं अग अग म्हशी हे गाणं. या गाण्याने आजही अनेक जण पोट धरून हसतात. अशात या दोघांनी गुपचूप गुपचूप, सुळावरची पोळी, सासू वरचड जावई, अरे संसार संसार, सासूरवाशिन अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *