BREAKING | क्लीन चिट दिल्यानंतरही आर्यन खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ? क्लब मधला तो व्हिडिओ झाला व्हायरल….

मुंबई | बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. कॉरडेलिया क्रुझ शीप वरती अमली पदार्थांच सेवन करताना त्यालाही अटक करण्यात आली. यावेळी सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. रात्रंदिवस बॉलीवूडच्या किंग खानचा मुलगा या सर्व प्रकरणातून सुटू शकेल की नाही याची सर्वजण वाट पाहत होते.

अशात मोठ्या प्रतीक्षेनंतर त्याला या प्रकरणातून क्लीन चीट मिळाली. मात्र यावेळी राजकीय खलबत देखील चांगलीच कुटली गेली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील यावेळी टीका झाली. तसेच या प्रकरणात नवाब मलिकांनीदेखील उडी घेतली होती. आता हे संपूर्ण प्रकरण शांत झाल आहे.

आर्यन खानला या प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. अशात त्याला त्याचा पासपोर्ट देखील पुन्हा मिळाला आहे. सर्व काही शांत असताना आता पुन्हा कुठेतरी या प्रकरणाची ठिणगी पेटत असल्याचे दिसत आहे. कारण आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आर्यन खान एका क्लबमध्ये आहे. इथे आपल्या मित्रांबरोबर तो मस्त चील करत आहे. नेहमीप्रमाणे त्याच्या हातात मद्याचा प्याला देखील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण वेगवेगळ्या चर्चा करत आहेत.

या चर्चेमध्ये काही बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आहेत. त्याचा हा व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या फॅनपेज वरून शेअर करण्यात आला आहे. अनेक व्यक्तींनी स्वतःच्या अकाउंटवरून देखील त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. सदर व्हिडिओ क्लिप सोमवारी 18 तारखेची असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

आर्यन खान आता पुन्हा एकदा वादाच्या विळख्यात अडकणार का ? असा प्रश्न अनेकांना पडलाय. अशाच सुश्मिता सेनने देखील हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुष्मिता सेनला गोल्ड डीगर म्हटल्यावर प्रियंका चोपडा भडकली आणि ती म्हणाली की, ” बॉलीवूडच्या सर्व स्टार किड्स पैकी आर्यन खान हा खूप वेगळा आहे. तो सगळ्यांपेक्षा एकदम कूल आणि डॅशिंग आहे.

त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्याचा चाहता वर्ग आणखीन वाढला आहे. मात्र आता तो त्याच्या आयुष्यामध्ये मोठी झेप घेऊ इच्छितो आहे. त्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न देखील करत आहे. लवकरच तो परदेशात जाऊन शिक्षण घेणार आहे तसेच अभिनय क्षेत्राशी संबंधित काम देखील करणार आहे.

त्याचा चहता वर्ग आता इतका वाढला आहे की, अनेक फॅन म्हणत बाहेर त्याला पाहण्यासाठी तासंतास उभे राहतात. आता त्याच्या आयुष्यात आणखीन कोणत्या अडचणी येऊ नयेत एवढीच इच्छा आहे.” अस ती म्हणाली आहे.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *