ब्रेकअपनंतर अनन्या पांडे ‘या’ अभिनेत्याला करत आहे डेट… लग्न ही करणार?

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या आगामी ‘लाइगर’ या चित्रपटात ती दक्षिणात्य अभिनेता विजय देवकोंडासोबत दिसणार आहे. अलीकडेच लाइगरच्या प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. अनन्याने आता पर्यंत कार्तिक आर्यनपासून इशान खट्टरपर्यंत सर्व कलाकारांसोबत काम केले आहे.

पण आजकाल ती त्याच्या वैयक्तिक आणि विशेष म्हणजे प्रेम कहानीमुळे चर्चेत आहे. शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर याला अनन्या बऱ्याच दिवसांपासून डेट करत होती. त्यावेळी दोघांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती.

दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये आणि इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे तिचे चाहते थोडे नाराज होते. मात्र आता तिने नवीन साथीदार शोधला आहे. आजकाल अनन्या पांडे हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे.

करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून 2019 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अशात आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. समोर आलेल्या माहितीनसार अनन्या सध्या मलंग फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. दोघांनीही आपलं नातं लपवून ठेवलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र हे दोघे आता पर्यंत अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये प्रेम असल्याचे म्हंटले जात आहे.

अनन्याचे नाव ईशान खट्टर बरोबर जोडले जाण्याआधी इतर अनेक लोकांसोबत जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती इशानच्या आधी करण जय सिंहला डेट करत होती. पण त्यानंतर खली-पीलीच्या सेटवर जेव्हा ती ईशानला भेटली तेव्हा या दोघांच्या प्रेमाची चर्चा रंगली.

दोघे मालदीवमध्ये देखील एकत्र सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे आता अनन्या ही आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या बाबत अद्याप कोणतीही माहिती या दोघांनी दिलेली नाही. चाहते त्यांच्या वक्तव्याची वाट पाहत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *