अभिनेत्री अंकिता लोखंडेच नवीन घर पाहिलं का? किंमत पाहून धक्काच बसेल

मुंबई | हिंदी मालिकांमधून प्रसिद्ध झालेली आणि आता बॉलिवूड देखील गाजवत असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या खूप चर्चेत आहे. तशी ती नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मात्र आता तिने जो व्हिओड शेअर केला आहे. तो विशेष व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये तिने आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची ओळख करून दिली आहे.

अंकिताच्या या व्हिडीओमध्ये ती सुरुवातीला आपल्या घराचे दरवाजे उघडताना दिसते. त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याजवळ जाते आणि त्यांची ओळख करून देत. यामध्ये ती तिचे सासरे, दिर, नणंद, सासू, आई आणि पती अशा सर्वच सदस्यांची ओळख करून देत असते. तसेच यामध्ये ती तिच्या घरचे किचन देखील दाखवत आहे. त्यानंतर शेवटी ती घरातील मंदिर देखील दाखवते. तिच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला क्यूकी सास भी कभी बहू थी हे गाणं वाजत आहे.

अंकिताचा हा व्हिडिओ पाहून अगदी त्या मालिकेची आठवण होत आहे. व्हिडीओमध्ये अंकिताने यामध्ये नारंगी आणि लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. तसेच तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळेच ठेवले आहेत आणि सोन्याचे अनेक अलंकार घातले आहेत. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ पोस्ट करत त्यावर एक कॅप्शन देखील लिहिलं आहे.

यात तिने एकता कपूर आणि स्मृती इराणी या दोघींचे आभार देखील मानले आहेत. तिने लिहिलं आहे की, ” अर्चना देशमुख X तुलसी विराणी, मला माझ्या घरातील पूजेच्या वेळी माझ्या कुटुंबासोबत हा व्हिडिओ रिक्रिएट करताना खूप मजा आली! हे तुमच्यासाठी @ektarkapoor & @smritiiraniofficial मॅडम, तुळशी कायम आमच्या हृदयात असेल! तुम्हा दोघांनाही हे आवडेल अशी आशा आहे.”

अंकिता लोखंडेने विकी जैन बरोबर लग्न केलं आहे. तसेच ती तिच्या सुखी संसारात आता मग्न आहे. तिने बनवलेला हा व्हिडिओ एका पूजेसाठीचा आहे. तसेच आता तिचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे, एकता कपूर अशा अनेक अभिनेत्रींसह काही चाहत्यांनी देखील तिला कमेंट केल्या आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *