‘ही’ मराठमोळी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात; पाहा नवऱ्याचे फोटो

मुंबई | मालिका विश्वातील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतेच शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर हृताने देखील प्रियकर प्रतीक बरोबर लग्न गाठ बांधली. अशात आता आणखीन एक अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री अमृता पवार ही सध्या तिच्या लग्नाच्या चर्चेत आहे. नुकतीच तिने एक बॅचलर पार्टी केली. यामध्ये तिने केलेली मज्जा मस्ती तिने चाहत्यांना देखील सोशल मीडियावर शेअर केली. यातील काही फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते खूप खुश आहेत. तसेच यातील एका फोटोमध्ये अभिनेत्रीच्या मागे “ब्राइड टू बी” असे लिहिलेलं दिसत आहे.

त्यामुळे आता लग्नाच्या यादीत तिचं देखील नाव शमील झालं आहे. तसेच या फोटोमध्ये तिच्या लग्नाच्या चर्चेवर शिक्कमोर्तब करण्यात आला आहे. मात्र तिच्या लग्नाबद्दल तारीख आणि बाकीची माहिती अजून पूर्ण समजू शकलेली नाही. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा संपन्न झाला होता. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

अभिनेत्री नील पाटील बरोबर विवाह करणार आहे. नील हा एक इंजिनिअर आहे. या दोघांबरोबर सध्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी देखील लग्नाच्या यादीत शामिल आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचा देखील साखरपुडा पार पडला. अशात आता अक्षया आणि अमृता या दोघींपैकी लग्नाची बाजी नेमकी कोणती अभिनेत्री पाहिले मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अमृताच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास सध्या ती तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत दिसते. तसेच या आधी ती स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत दिसली होती. या ऐतिहासिक मालिकेत तिने जिजामाता ही मुख्य भूमिका साकारली होती. यातून ती घराघरात पोहचली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *