अमिताभ बच्चन यांना एका मुलीने केलं जोरदार किस; फोटो शेअर करत बिग बी म्हणाले…

दिल्ली | बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन अभिनयात आणि सोशल मीडियावर ॲक्टिव राहण्यात भल्या भल्या तरुण कलाकारांना मागे टाकतात. अशात त्यांचा अभिनय किती दांडगा आहे हे आपल्याला माहीतच आहे. आजही ते चित्रपटात काम करत आहेत. पण आता त्यांच्या लूकवर एक मुलगी फिदा झाली आहे आणि तिने चक्क त्यांच्या संपूर्ण चेहऱ्याला किस केलं आहे.

किस करतानाचे फोटो आता सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होतं आहेत. त्या मुलीने बिग बींचा एक फोटो घेऊन त्यावर खूप सारे किस केले आहेत. तसेच पुढे तिने लिहिलं आहे की, ” तुमचे डोळे आणि स्माइल साठी.” या मुलीच्या या पोस्टवरून “बुढ्ढा होगा तेरा बाप ” हा डायलॉग आठवतोय.

बिग बींचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते त्यांना खूप साऱ्या कमेंट करत आहेत. अशात हा किस केलेला फोटो बिग बींनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसचं याला मजेशीर असं कॅप्शन देखील लिहिलं आहे.

यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ” अरे….. देवी जी…. थोडी तरी जागा सोडायची होती स्माइल साठी…” बिग बींच हे कॅप्शन देखील लोकांना खूप आवडलं आहे. त्यांनी अगदी नम्रपणे कुणालाही चुकीचं काही वाटणार नाही आणि त्यांच्याबद्दल कोणी चुकीचं काही बोलणार नाही असं कॅप्शन लिहिलं आहे.

बिग बींचा हा फोटो पाहून चाहते त्यांना अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. यात एका युजरणे लिहिलं आहे की, ” किती क्यूट दिसतय” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, ” देवीजी जया जिना नाही माहित वाटतं.” तसचं यावर अनेकांनी हसण्याचे ईमोजी शेअर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बिग बींनी स्वतः किस हे फिल्टर वापरत तो फोटो काढला होता. तोच फोटो त्या मुलीने पुन्हा एकदा पोस्ट केला आहे. त्यावरून बिग बी पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले.

बिग बींच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास ते लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र या चित्रपटात झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात नागार्जुन, रणवीर कपूर, आलिया भट आणि मौनी रॉय हे कलाकार देखील मोठ्या भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटासह बिग बी प्रभास आणि दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटात देखील झळकणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *