अल्लू अर्जुन अडचणीत; ‘या’ कारणामुळे होत आहे प्रचंड ट्रोल

दिल्ली | ‘पुष्पा द राईज’ या दाक्षिणात्य चित्रपटाने फक्त साऊथ नाही तर मुंबईसह इतर शहरामध्ये देखील हवा केली. यामुळे अल्लू अर्जुन या अभिनेत्याने पुष्पा हे मुख्य पात्र साकारले होते. पुष्पा नाम सूनके फ्लॉवर समझेक्या… फायर हु मैं.” हे आणि असे अनेक अतरंगी डायलॉग या चित्रपटात आहेत. तसेच चंदनाच्या लाकडांची तस्करी आणि त्यासाठीच्या वेगवेगळ्या कल्पना या चित्रपटात दिसल्या. अशात रोमँटिक, ड्रामा या सर्वांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.

या चित्रपटात एक से बढकर के डायलॉग आहेत. तसेच गाणी आणि डान्स स्टे्प्सतर भल्या भल्या बॉलिवूड कलाकारांना लाजवतील अशा आहे. चित्रपटातील आयटम साँग आणि त्यावर अल्लूने केलेला डान्स समंथा रूथ प्रभू या अभिनेत्रीवर देखील भारी पडला. अशात या चित्रपटाने बॉक्सऑफसवर कोटींची कमाई देखील केली.

या चित्रपटात अल्लू अर्जुनची बॉडी आणि त्याची चालण्याची पद्धत या सगळ्यांनीच त्याचा चाहता वर्ग आता आणखीन दुपटीने वाढला आहे. मात्र आता त्याला त्याच्या एका फोटोमुळे ट्रोल केलं जातं आहे. या फोटोमध्ये तो खूप जाड झालेला दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना हे आवडलं नाही. म्हणूनच सगळीकडून त्याच्यावर टीका होत आहे.

अशात काही नेटकऱ्यांनी तर अगदी खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे. काहींनी त्याला “मोटे” म्हणून चिढवल आहे तर काहींनी त्याला “वाडा पाव” असं म्हटलं आहे. तर एका युजरने म्हटलं आहे की, ” किती बेकार दिसतोय हा.” आता अशी देखील चर्चा सुरू आहे की, पुष्पा या चित्रपटाचा पार्ट २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कदाचित अल्लूचा हा लूक याच चित्रपटासाठी असू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *