ऐश्वर्या रायच्या सुंदरतेचा ‘या’ फोटोने केला पर्दाफाश; फोटो पाहून म्हणाल….

दिल्ली | बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींची यादी काढली तर या यादीत ऐश्वर्या रायचा नंबर या यादीत प्रथम क्रमांकावर लागतो. ती आता विवाहित आहे तिला आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. एका मुलीची आई असून देखील तिच्या सुंदरतेमुळे तिच्या वयाचा कुठलाच अंदाज लागत नाही. अभिनेत्री आधीपासूनच दिसायला खूप सुंदर आहे.

अनेक अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करतात. कुणी ओठ तर कुणी गाल तर कुणी नाक चांगले दिसावे म्हणून वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करत असतात. अशात आता या मध्ये ऐश्वर्या राय शामिल नाही. तिने सुंदर दिसण्यासाठी कधीच कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. ती आधीपासूनच खूप सुंदर आणि देखणी आहे.

आजही तिच्या एका एंट्रीने तिकीट बारीवर गर्दी उफाळून येते. लग्न झाल्यावर ती चित्रपट सृष्टीत जास्त झळकली नाही. मात्र लग्ना नंतरचा ये दिल मुशकील हा चित्रपट तिच्या सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटात तिचा खूप छोटा रोल होता. मात्र ती यामध्ये आहे म्हणून चित्रपट पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी उफाळून आली होती.

अशात आता सोशल मीडियावर तिचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो तिच्या पासपोर्टचा आहे. पासपोर्ट खूप जुना असल्याचे समजते. कारण यामध्ये ऐशर्या थोडी लहान दिसते आहे. सहसा पासपोर्ट किंवा अन्य शासकीय कागदपत्रांवर फोटो नेहमी खराब असतो. मात्र ऐश्वर्याचा हा फोटो खूप सुंदर आहे. तिने या फोटोमध्ये कोणताही मेकअप केलेला नाही. केस देखील अगदी साधे ठेवले आहेत. तरी देखील ती यामध्ये खूप सुदंर दिसते आहे.

तिचा हा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. साल २००७ मध्ये तिने बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चन बरोबर लग्न केले. त्यानंतर तिला आराध्या नावाची एक मुलगी झाली. त्यामुळे ती सध्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *