ऐश्वर्या राय बच्चनवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

दिल्ली | सरबजीत सिंगला हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या न्यायालयाने 1991 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आणि 2013 मध्ये त्याचा मृत्यू झाला. दलबीर कौरने आपल्या भावाला मुक्त करण्यासाठी दीर्घ लढा दिला होता. यासाठी ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली.

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये तुरुंगात असलेल्या सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौर हिचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ती 60 वर्षांची होती. मृत्यूचे कारण कार्डिअॅक अरेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी २ वाजता तरनतारनच्या भिखीविंड गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दलबीर कौर यांना शनिवारी रात्री वेदना होत होत्या. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना अमृतसर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 1991 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने सरबजीत सिंगला भारतीय हेर असल्याच्या कारणावरून फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर सरबजीतची बहीण दलबीर कौर प्रसिद्धीच्या झोतात आली.

2013 मध्ये सरबजीतची पाकिस्तानच्या तुरुंगात हत्या करण्यात आली होती. दलबीर कौर यांनी 1991 पासून आपल्या भावाची सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले. यादरम्यान दलबीर कौर यांनी सरबजीत सिंगला वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. सरबजीतच्या सुटकेसाठी तिने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अगदी परराष्ट्र मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या.

2011 मध्ये ती आपल्या भावाला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. 2013 मध्ये जेव्हा सरबजीतवरील हल्ल्याची माहिती भारतात पोहोचली तेव्हा ती सरबजीतच्या मुलींसोबत पाकिस्तानात गेली होती.

पाकिस्तानच्या तुरुंगात प्राण गमावलेल्या सरबजीत आणि दलबीर कौर यांच्यावर 2016 मध्ये एक चित्रपटही बनवण्यात आला होता. रणदीप हुड्डाने सरबजीतची भूमिका केली होती, तर ऐश्वर्या रायने दलबीर कौरची भूमिका केली होती. दलबीर कौर यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

दलबीर कौरचे निधन झाल्यानंतर तिची भूमिका ऐश्वर्या राय बच्चन हिने साकारल्याने ती देखील खूप दुःखी झाली. तिने आणि सरबजीत या चित्रपटातील सर्व टीमने सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *