अग्नीपथ योजनेत नेमकं आहे तरी काय?

दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये आग्निपथ योजनेवरून वाद सुरू आहेत. अनेक जण या योजनेचा विरोध करत आहेत. सैन्य भरतीसाठी असलेली ही योजना भारतीय तरुणांना चुकीची वाटत आहे. अशात बिहारमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले यामुळे मोठी निदर्शने केली गेली. आंदोलकांनी बऱ्याच खासगी आणि शासकीय वाहनांच नुकसान केलं.

गाड्या जाळण्यात आल्या, ट्रेनला देखील अग्नी दिली गेली. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. अग्निपथ योजनेमुळे अग्नितांडव उठलेलं पाहायला मिळालं. अशात माध्यमांवर या विषयी बातम्या येऊ लागल्या. मात्र यामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. एक तरुण मुलगा त्या व्हिडीओमध्ये रडत असताना दिसला.

त्याच्या चार चाकी गाडीची अगदी दुरवस्था या अग्नितांडवात झाली होती. त्यामुळे तो मुलगा रडत होता आणि म्हणत होता की, असं करून न्याय मिळणार आहे का? त्याचा हा प्रश्न आणि त्याची व्याकुळता पाहून नक्कीच गोंधळ घालून आंदोलन करणाऱ्यांना थोडी तरी लाज वाटली असावी.

सरकार येते सरकार जाते. प्रत्येक सरकार नवीन योजना घेऊन येत असते. जर यातील काही गोष्टी आपल्याला पटल्या नाही तर निवेदने, पत्र व्यवहार, शांतता पूर्ण वातावरणात निदर्शने, न्यायालय या सर्व गोष्टींतून आपण या निर्णयाला विरोध करू शकतो. मात्र हे सर्व मार्ग सोडून अनेक व्यक्तींनी हिंसक आंदोलन केले. ज्यामध्ये झालेल्या जाळपोळमध्ये अनेक सामान्य माणसे भरडली गेली.

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणतीही वस्तू घेण्यासाठी आपली जमापुंजी खर्च करत असतो. मेहनतीने कष्टाने मिळवलेल्या वस्तूंची अशी दुर्दशा झाल्यास प्रत्येकालाच वाईट वाटते. अशात आता सुरू असलेला हा सर्व गोंधळ नेमका का होत आहे. या योजनेत नेमक काय आहे हे जाणून घेऊ…

• मुळात आधी अंग्निपथ योजना काय आहे हे माहीत करून घेऊ…
तर सैन्य भरतीसाठी आखण्यात आलेल्या नवीन नियमावलीला अग्निपथ योजना असं म्हणतात. या मध्ये काम करणारे सर्व तरुण अग्नवीर म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच या योजनेला अग्निपथ हे नाव दिलं गेलं आहे. सैन्यात काम करणाऱ्या व्यक्तीचं जास्तीत जास्त वय ३२ वर्षे एवढं असतं.

तर यात बदल करण्यात आला आहे. आता सैन्यात २४ ते २५ वर्षांच्या व्यक्ती काम करू शकतात. कारण भारतीचे वय हे १७.५ ते २१ वर्षे केलं असून फक्त ४ वर्षे सेवेत राहता येणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल यामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्ती या अधिक मेहनतीचे आणि ताकतीचे काम करू शकणाऱ्या असाव्यात म्हणून तरुण वयोगट ठेवण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे.

यामध्ये भरती झाल्यावर सुरुवातीचे ६ महिने ट्रेनिंग दिली जाणार आहे. त्यानंतर ३.५ वर्षे सैन्यात त्या तरुणाला सेवा देता येणार आहे. यावेळी सुरवातीचा पगार हा ३० हजार रुपये एवढा असेल. तसेच चौथ्या वर्षी पगार ४० हजारापर्यंत केला जाणार आहे.

जास्तीत जास्त तरुणांना देशासाठी सेवा देण्याची संधी मिळावी म्हणून ही योजना आणली असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. सेवतून चार वर्षांनी रिटायर झाल्यावर त्या व्यक्तीला १० ते १२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच पुढील नोकरीसाठी अगदी कॉर्पोरेट क्षेत्रात देखील त्यांना नोकरीसाठी मदत केली जाणार आहे.

मात्र या भरतीसाठी पूर्वी प्रमाणेच लेखी आणि फिजिकल परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे निवड प्रक्रिया अगदी जशीच्या तशी पण सेवेचा काळ कमी केल्याने तरुण वर्ग खूप नाराज आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *