आफ्रिकन दिसणारी ही जोडी गाजवत आहे भारत; पंतप्रधान मोदींनी देखील केलं आहे कौतुक

दिल्ली | शेरशाह हा चित्रपटात प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलच डोक्यावर घेतलं. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट खूप गाजला तसेच त्यातील गाणी देखील खूप हिट झाली. अनेकांनी राता लंबिया …. या गाण्यावर रील व्हिडिओ देखील बनवले. मात्र यामध्ये एका आफ्रिकन जोडीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

ही जोडी आजही आफ्रिकेतील एका दुर्गम भागात राहून बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यावर रील व्हिडिओ बनवत आहे. आजही त्यांचे अनेक व्हिडिओ खूप व्हायरल होतं असतात. तर आज याच जिदिबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या दोघांची नावं किली आणि नीम पॉल अशी आहेत. हे दोघेही तांझानिया येथे राहतात. त्यांना बॉलिवूड गाण्यांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते दोघे नेहमीच प्रत्येक गाण्यावर अगदी परफेक्ट लिप्स मॅच करत रील व्हिडिओ बनवत असतात.

या दोघांची ही शैली एवढी सुंदर आहे की, अनोळखी भाषा असून देखील त्यांना अगदी नीट या गाण्याचे बोल बोलता येतात. किली आणि नीम हे दोघे बहीण भाऊ आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या रील व्हिडीओमुळे अनेक जण त्यांचे फॅन झाले आहेत.

अशात या दोघांची अधिक माहिती बीबीसी न्युज आफ्रिकाने जाणून घेतली आहे. या वाहिनीने किली आणि नीम या दोघांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत बातचीत करताना समजले की, किली हा २६ वर्षांचा आहे तर त्याची बहीण नीम ही २३ वर्षांची आहे.

हे दोघेही आफ्रिकेतील अतिदुर्गम भागात राहतात. गावात वीजपुरवठा असल्याने त्याची बहीण त्याचा मोबाईल फोन चार्ज आणि रिचार्ज करण्यासाठी दुसऱ्या जवळच्या शहरात जात असते.

बहीण भावाची ही जोडी ट्रेडिशनल मसाई ड्रेसमध्ये रील व्हिडिओ शूट करत असतात. किलीचे इंस्टाग्रामवर आता खूप फॉलोवर्स वाढले आहेत. त्याचे इंस्टाग्रामवर जवळजवळ ३.८ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्याच हे अकाउंट नीट पाहिलं तर लक्षात येत की, तो एक व्हिडिओ क्रिएट आहे.

किली आणि नीम ही जोडी बॉलिवूडच्या शेरशाह या चित्रपटातील एक गाण्यामुळे रातोरात हिट झाली आहे. त्या दोघांचा राता लंबिया… या गाण्याचा व्हिडिओ त्यावेळी खूप व्हायरल झाला होता.

किली आणि नीम ही जोडी भारतीयांना देखील खूप आवडते आहे. या दोघांना भारताकडून खूप प्रेम मिळत आहे. यात एवढंच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या जोडीच कौतुक केलं आहे.

तंजानिया येथील भारतीय उच्च कमीशनर यांनी देखील या दोघांचा सन्मान केला आहे. गुल पनाग, आयुष्मान खुराना, ऋचा चड्ढा, भाग्यश्री, टिस्का चोपड़ा सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो केलं आहे. या दोघांची प्रसिध्दी एवढी वाढली आहे की, अनेक ब्रँडने देखील यांच्याशी पेड प्रमोशन साठी करार केले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *