फेसबुक पेजवर अ’श्ली’ल फोटो झाले व्हायरल; सोशल मीडियाने मराठी अभिनेत्याचा केला घात….

मुंबई | सोशल मीडियावर आणि त्यावर होणारे गुन्हे या बाबत आपण नेहमीच वाचत असतो ऐकत असतो. अनेक अशा घटना घडलेल्या आहेत यामध्ये सायबर क्राईममुळे अनेकांना लाखोंचा फटका बसला आहे. अनेकांची फसवणूक आणि अब्रुनुकसानी झाली आहे. असाच एक भयंकर प्रकार मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्या बरोबर देखील घडला आहे.

अभिनेता संतोष जुवेकर हा सध्या रुपेरी पडद्यावर झळकत नाही. तो गेल्या अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. मात्र तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. चाहत्याना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे अपडेट देत असतो. अशात त्याच्या फेसबुक पेजवर काही अ’श्ली’ल फोटो पोस्ट करण्यात आले आहे.

एवढ्या चांगल्या अभिनेत्याच्या पेजवर असे फोटो पाहून त्याचे चाहते थोडे गोंधळात पडले. अनेक जण त्याला या विषयी विचारू लागले. तर त्याने आता इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली आहे. तसेच सत्य काय आहे याचा उलगडा केला आहे.

त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या फेसबुक पेजचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मित्रांनो माझ facebook पेज काही महिन्यांन पूर्वी हॅक झालं होत. त्यावर फारच अश्लील फोटो पोस्ट केले जात आहेत.

मी ह्याची रीतसर तक्रार केली आहे cyber crime आणि local police station ला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या page ला report करून block करा. माझ्या त्या page च्या profile चा screenshot इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल. तुमच्या ह्या सहकार्यासाठी धन्यवाद.”

त्याची ही पोस्ट वाचून समजते की, तो देखील सायबर क्राईमचा शिकारी झाला आहे. त्याच्या या घटनेची पोसली चौकशी आणि तपास करत आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल. संतोष जुवेकरने आपल्या अभिनय कारकिर्दीला 2004 मध्ये सुरुवात केली. त्याने एका मराठी नाटकात मकरंद राजाध्यक्ष नरेन देशमुख यांची भूमिका साकारली होती. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित या नाटकात विक्रम गोखले देखील होते.

त्याने लवकरच विविध दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि या गोजिर्वाण्य घरात या कार्यक्रमाद्वारे तो लोकप्रिय झाला. 2006 मध्ये राजीव पाटील यांच्या ब्लाइंड गेम या चित्रपटाद्वारे त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात अनंत जोग आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे छोट्या भूमिकेत होती. नंतर त्याने झेंडा , मोरया , मॅटर यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आणि त्याचे हे चित्रपट खूप गाजले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *