अभिनेते राज बाबर यांना सुनावली 2 वर्षांची पोलीस कोठडी, बूथ अधिकाऱ्याला केली होती मारहाण

मुंबई | हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता राज बाबर यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनी साल 1996 मध्ये एका अधिकाऱ्याला जबर मारहाण केली होती. या प्रकरणी लखनऊ न्यायालयात खटला सुरू होता. दरम्यान आता त्यांना 2 वर्षे जेलमध्ये रहावे लागणार आहे.

या घटनेला आता तब्बल 26 वर्षांचा काळ लोटला आहे. लखनऊ येथील आमदार खासदार न्यायलयाने राज बाबर यांच्या विषयी हा निर्णय घेतला आहे. 2 मे 1996 रोजी निवडणूकी दरम्यान त्यांनी बूथ अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यावेळी ते काँग्रेस पक्षात होते.

सदर घटनेबाबत अशी माहिती समोर आली आहे की, कोर्टाने राज बब्बर यांना 6500 चा दंडही ठोठावला आहे. निकालाच्या वेळी राज बब्बरही न्यायालयात उपस्थित होते. खरं तर, 1996 मध्ये राज बब्बर समाजवादी पक्षाशी संबंधित होते आणि सपाचे लोकसभेचे उमेदवार होते.

ते अटलबिहारी बाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. याचदरम्यान बूथ अधिकाऱ्याशी त्यांची बाचाबाची झाली आणि नंतर बाबर यांनी त्या अभिकऱ्यला मारहाण केली. या प्रकरणी २३ मार्च १९९६ रोजी वजीरगंज पोलिस ठाण्यात राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर १४३, ३३२, ३५३, ३२३, ५०४, १८८ ही कलमे लावण्यात आली.

याप्रकरणी लखनौचे खासदार आमदार न्यायालयाने राज बब्बर यांना शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, राज बब्बरला दोन वर्षांच्या शिक्षेसह 6.5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. तसेच अशी माहिती समोर आली आहे की, राज बब्बर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *