अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचे शेवटचे क्षण पाहून डोळ्यात येईल पाणी

मुंबई | बॉलिवूड हे एक असं विश्व आहे ज्याने आजवर अनेक हरहुन्नरी कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे. सिने विश्वातील प्रत्येक तारा हा आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने आणि डायलॉग फेकण्याच्या अनोख्या शैलीने ओळखला जातो. अशात आता ६० ते ९० च्या दशकातील अनेक कलाकार हे जग सोडून गेले आहेत. मात्र त्यांच्या अभिनयाने ते आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यातीलच एक अवलिया म्हणजे अभिनेते प्राण. खणायकाच्या नंतर प्राण हेच नाव घेतलं जातं होतं.

त्यांची खलनायकाची भूमिका एवढी जबरदस्त होती की, सगळेच त्यांच्या नावाने चळचळ कापायचे. अनेक लोकांनी तर आपल्या नवजात बाळाचं नाव प्राण ठेवण देखील सोडुन दील होतं. एवढी त्याच्या अभिनयाची दहशत होती. अशात आज १२ जुलै रोजी प्राण यांची पुण्यतिथी असते. यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही रोमांचक किस्से जाणून घेऊ.

बरखुदार हा शब्द कानी पडताच सर्वप्रथम मनात प्राण यांचीच प्रतिमा उभी राहते. प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील कृष्णा सिकंद हे सिव्हिल इंजिनिअर होते. प्राण यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या.

तरुणपणी फोटोग्राफीची आवड असलेल्या प्राण यांनी भारताच्या फाळणीपूर्वी काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले. लाहोरमध्येही त्यांनी 1942 ते 46 या काळात 22 चित्रपटांमध्ये काम केले. फाळणीनंतर ते पत्नी आणि मुलासह पाकिस्तानातून भारतात आले होते.

प्रेक्षकांच्या नजरा पडद्यावरुन हिरावून घेता येणार नाहीत अशा पद्धतीने प्राण आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर करत होते. त्यामुळेच असे म्हटले जाते की, ते चित्रपटांमध्ये नायकापेक्षाही जास्त फी घेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी डॉन चित्रपटासाठी अडीच लाख रुपये घेतले होते.

तर प्राण यांनी पाच लाख रुपये एवढे मोठे मानधन घेतले होते. प्राण यांचे खरे नाव किशन सिकंद होते. असे म्हटले जाते की, प्राण यांना खरे तर फोटोग्राफर बनायचे होते. पण त्यांची गडी अभिनयाच्या दिशेने वळली. प्राण यांनी 1942 मध्ये खानदान या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.

प्राण यांना तीनदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 1997 मध्ये त्यांना फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट ही पदवी देण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्राण यांना 2001 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, तसेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी 22 चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या.

चित्रपटांमध्ये निगेटिव्ह भूमिका करून प्राण यांनी आपल्या नावात खलनायकाला टॅग जोडला होता. लाल बूँद डोळे जणू काही डोळ्यांतून आज ओकत आहे असे प्राण होते. लोकांच्या मनातून हिरो बनूनच लोकप्रियता मिळते हा गैरसमज त्यांनी त्यांच्या अभिनयाने दूर केला होता. निर्मात्यांनीही त्यांना अधिक पैसे देण्यास कधीच टाळाटाळ केली नाही.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी ‘नसीब’, ‘अमरदीप’ ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘मजबूर’, ‘दोस्ताना’, ‘नसीब’, ‘डॉन’, ‘जंजीर’, ‘मुनीम जी’, ‘अमरदीप’ अशा भूमिका केल्या. कालिया’, ‘अमर अकबर अँथनी’ हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये मिळतात.

प्राण यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. थरथरत्या पायांच्या आजाराने ते 1997 पासून व्हील चेअरवर होते. 2013 साली वयाच्या 93 व्या वर्षी प्राण यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राण यांची प्राण ज्योत मालवली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *