यशाच्या अडचणीत वाढ; तीन दिवस रहावं लागणार पोलीस कोठडीत, सुलेखा ताई लढणार यशच्या बाजूने

मुंबई | आई कुठे काय करते ही मालिका आता मोठ्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत नुसता गोंधळ सुरू आहे. यशवर निलच्या खुनाचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मालिकेत अरुंधती तिच्या म्युजिक स्कूलच्या कामासाठी इंदौरला गेलेली दिसली. तसेच नंतर यश इशा आणि गौरी हे तिघे एका ठिकाणी फिरायला गेले होते. तिथे यश बरोबर मोठी दुर्घटना घडली.

नील हा इशाला फसवून तिच्यावर जबरदस्ती करताना दिसला. वेळीच तिथे यश पोहचला आणि नील बरोबर त्याची मारामारी झाली. यात यशने त्याच्या डोक्यावर एक लोखंडी रॉड मारला. हा मार एवढ्या जोरात लागला की यामधे नील जागीच जमिनीवर पडला.

त्याच्या मित्रांनी सांगितले की त्याचा मृत्यू झाला आहे. एकीकडे यश बरोबर हे सर्व घडले तर दुसरीकडे अनघा जिन्यावरून पडली. त्यामुळे देशमुख कुटुंबावर नुसती संकट येत असताना दिसली.

अशात आता यशच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. त्याला ३ दिवस पोलिस कोठडी सुनावली जाणार असल्याची शक्यता आहे. अशात त्यांना एका चांगल्या वकिलाची गरज आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी आशुतोषची आई म्हणजेच सुलेखा ताई ही केस लढणार आहेत.

नुकताच या मालिकेचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामधे सुलेखाताई यशची केस लढताना दिसणार आहेत. लग्न आधी त्यांनी वकिली पूर्ण केली होती. तर सुलेखा ताईंची ही पहिलीच केस आहे. अशात त्या यशला न्याय मिळवून देऊ शकतील की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *