पतीने केला मानसिक छळ, भावाचा मृत्यूशी सामना, असा होता संजनाचा भूतकाळ

मुंबई | आई कुठे काय करते ही मालिका आज घराघरात पोहोचली आहे. यामध्ये अरुंधतीला संजना नेहमी त्रास देताना दिसते. संजना हे पात्र मालिकेत रुपाली भोसले साकारते. अशात अरुला त्रास देणाऱ्या संजनाने तिच्या खऱ्या आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या आहेत. तिच्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग येऊन गेले आहेत.

रुपाली भोसले हिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील काही वाईट आठवणी सांगितल्या होत्या. तिचा हा प्रवास खरोखर दुःखद आहे. रुपाली ज्यावेळी अभिनयात नवखी होती याच वेळी तिचं लग्न झालं. लग्ना आधी ती आई बाबा आणि लहान भाऊ यांच्याबरोबर राहत होती. लग्नानंतर तिचा पती तिला लंडनला घेऊन गेला. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले.

अशात रुपाली तिच्या घरी मोठी. तिचा भाऊ तिच्यापेक्षा लहान होता. त्यामुळे तिच्यावर आई बाबांची जबाबदारी होती. सदर गोष्टीची माहिती तिने तिच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना लग्न आधीच दिली होती. मात्र लग्नं झाल्यावर काही दिवसांनी तिला वेगळे चित्र दिसले. तिच्या पतीने तिच्या आई बाबांना कोणतीही मदत करण्यास नकार दिला.

एवढेच नाही तर त्याने आणि सासरच्या मंडळींनी तिचा खूप मानसिक छळ सुरू केला. यावेळी ती खूप त्रस्त झाली होती. ती सतत तिच्या पतीला विनवण्या करत होती. मात्र तिच्या पतीने एकदाही तिचं ऐकलं नाही. तसेच तिचा खूप छळ केला. यावेळी रुपाली खूप प्रयत्न करून तिथून कशीबशी सुटली आणि भारतात परतली. इकडे आल्यावर ती आई बाबांकडे आली.

याच दरम्यान तिच्या लहान भावाचा एक मोठा अपघात झाला. या अपघातात तो बराच जखमी झाला होता. त्यावेळी बरेच दिवस रुपालीकडे कोणतही काम नव्हतं. त्यामुळे तिला आशा होती की, आता तरी तिचा पती तिला मदत करेल. मात्र त्याने फोन करून साधी चौकशी देखील केली नाही. त्यामुळे तिने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

अशात तिच्या आयुष्यात तो फार मोठा आणि कठीण काळ होता. तिला भावाला मानसिक धीर द्यायचा होता. शिवाय आई बाबांना सांभाळायचे होते. यात तिची खूप फरफट झाली. ती खूप जास्त नैराश्यात गेली. एक दिवस तिच्या मनात जीव दिण्याचा विचार आला. मात्र तिने असं केल्यास तिचे आई बाबा आणखीन खचले असते. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी तिने स्वतःला धीर दिला. तिने या सर्व अडचणींवर मात करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आज ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील एकदम बिनधास्त झाली आहे. तिचा भाऊ आई बाबा हे सर्वजण आता एक सुखी आयुष्य जगत आहेत. संजना देखील आता मानसिक त्रासातून बाहेर आली आहे. तसेच ती देखील आई बाबा आणि भावाबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *