‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्धला दिली विठ्ठलाची उपमा, आजी म्हणाली तूच माझा विठ्ठल…

मुंबई | आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अशात आई कुठे काय करते या मालिकेमुळे ते विशेष प्रसिध्दी होतात आले आहेत. त्यांनी साकारलेल्या अनिरुद्ध या पत्राचा लोक एवढा द्वेष करतात की, ते दिसले तरी त्यांच्यावर टीका आणि मारण्याची भाषा होते. अर्थात मिलिंद गवळी यांच्यासाठी ही त्यांच्या अभिनयाची खरी पोचपावती आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सध्या पंढरीच्या वारीला गेलेले दिसत आहेत. अनेक जण सोशल मीडियावर वारीमधील अनेक किस्से आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशात मिलिंद गवळी हे देखील बऱ्याच वर्षांपूर्वी वारीला गेले होते. वारीला जाण्याचं कारण होतं त्याचा एक चित्रपट.

त्या चित्रपटात त्यांना एका साधू महाराजांची भूमिका साकारायची होती. त्यामुळे त्यांनी साधूच्या वेशाता वारी गाठली. त्यावेळी तिथे त्यांना आलेला प्रसंग मिलिंद यांनी आता सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या चित्रपटाचा वारीतील सीन पोस्ट केला आहे.

तसेच कॅप्शनमध्ये वारीत आलेला अनुभव त्यांनी लिहिला आहे. यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, “आषाढी एकादशी आता जवळ येत आहे, जवळजवळ 21 वर्षापूर्वी “विठ्ठल विठ्ठल ” सिनेमाच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर माझी वारी झाली होती. एक विलक्षण वेगळा अनुभव माझ्या गाठीशी बांधून मी माझ्या आयुष्याचा प्रवास करतो आहे.

पांडुरंगाच्या वारीला जाणं हा एक वेगळाच अनुभव आहे, ज्यांनी कोणी वारी केली आहे त्यांनाच तो माहितीये, ज्यांच्या आयुष्यामध्ये वारी घडली नाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोलाचा राहून गेलेलं आहे ! काही दिवसापासून पांडुरंगाच्या वारीच्या वारकऱ्यांच्या बातम्या कानावर पडत आहे.”

पुढे चित्रपटाच्या सीनचे वर्णन करत त्यांनी सांगितले की, “छान पाऊस सुरू झाला आहे, “विठ्ठल विठ्ठल “सिनेमा मेकिंगच व्हिडीओ फुटेज मला मिळालं, सहा सात जुलै 2003, आळंदी पासून शूटिंग करत करत पंढरपूर पर्यंत आम्ही चाललो होतो, गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित रिफ्लेक्शन निर्मित वृंदा अहिरे, मिताली जगताप, श्वेता लंडनचे प्यारी शिवपुरी आणि अलकाताई कुबल, प्रसाद ओक व शरद पोंक्षे हे पाहुणे कलाकार.”

चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल ते म्हणाले की, ” सगळ्यांसाठीच हा सिनेमा वेगळा अनुभव देऊन गेला . शासनाचे 2 बक्षीस, एवरेस्ट कडे येथे राइट्स आहेत, आता गेली अडीच तीन वर्ष आई कुठे काय करते ” मधल्या अनिरुद्ध देशमुख माझ्या या भूमिकेला बायकांनी असंच शिव्या दिल्या आणि देत आहेत, अजूनही देतायेत. अशावेळेला “विठ्ठल विठ्ठल “या सिनेमातल्या भूमिके चा अनुभव खूप आवर्जून आठवतो.”

पुढे अनुभव सांगत त्यांनी लिहिले आहे की, ” तो अनुभव असा आहे, मी एक साधू संन्याशाच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो, शूटिंग सुरू व्हायला थोडा अवकाश होता आणि तीन चार बायका माझ्यासमोर येऊन बसल्या, एका वयस्कर बाईन माझ्या पायावर डोकं ठेवलं, आणि मला म्हणाली “बाबा माझ्या आयुष्याच सार्थक झालेला आहे.

दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत, मुलगा रांके ला लागलेला आहे, आता बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या, म्हणजे मी शांतपणे डोळे मिटू शकेन “, मी त्या बाईंना म्हणालो “आजी जात्या विठ्ठलाच्या पाया पड माझ्या नको, मी एक कलाकारे आणि हा साधू चा रोल करतोय’ ”

त्या बाई म्हणाल्या “नाही बाळा, तूच मला आशीर्वाद दे, कारण मला दिसतो ना विठ्ठल तुझ्या मध्ये.” कलाकारच आयुष्य किती वेगळ आणि सुंदर आहे बघा, एका बाजूला अनिरुद्ध देशमुखला एक बाई चपलेने मारेन असं म्हणते आणि “विठ्ठल विठ्ठल “या भूमिकेसाठी एका बाईला माझ्यामध्येच विठ्ठल दिसतो, पांडुरंग दिसतो. विलक्षण नाही का हे सगळं ! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !” असं त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.” मिलिंद गवळी यांची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *