लक्षाचे शेवटचे क्षण होते अतिशय वाईट; वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | मराठी तसेच हिंदी सनेसृष्टितील दिवंगत अभिनेता लक्षा हा आजही आपल्या निखळ विनोदी अभिनयाने अजरामर आहे. त्याला जाऊन आज जवळपास १४ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही तो आपल्यात नाही असे जाणवत नाही. याचे कारण म्हणजे त्याने या सिने विश्वात केलेली कामगिरी. त्याने त्याचा कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट केले आहेत.

महेश कोठारे हे लक्षाचे आवडते दिग्दर्शक होते. त्यांच्या बरोबर लक्ष्मीकांत बेर्डेने बरेच चित्रपट केले. यातील झपाटलेला हा चित्रपट मोठा हिट ठरला. चित्रपटात असलेले हॉरर सीन हे लक्षामिकांतच्या एन्ट्रीने नुसते कोलमडून जात होते. यातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. अनेकजण आजही हा चित्रपट आवडीने पाहतात.

तसेच सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या दोन्ही कलाकारांबरोबर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अशोक सराफ आणि लक्षा ही जोडी देखील तिकीट बारिवर नुसता धुमाकुळ घालत होते. सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्षा यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. यामध्ये देखील या तिघांनी उत्तम अभिनय केला होता.

तसेच या चित्रपटात लक्षाने गरोधर महिलेचे पात्र देखील साकारले होते. त्याच्या या पात्राला देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता तो आपल्यामध्ये नाही. त्याचा शेवटचा काळ देखील खूप बिकट होता. एका गंभीर आजाराने त्याला ग्रासले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या काळात तो खूप एकटा राहत होता.

त्याचा शेवटचा चित्रपट हा पछाडलेला होता. त्याला मूत्रपिंडाचा एक आजार झाला होता. या आजाराने त्याला खूप त्रास झाला. त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तो लोणावळ्यात त्याच्या एका घरी राहत होता. यावेळी त्याने कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या निधनाने त्या वेळी सगळीकडे शोकाकुल वातावरण होते. आज तो आपल्यात नाही मात्र त्याची पुढची पिढी देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

त्याच्या आठवणीत आजही अनेक वाहिन्यांवर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर या व्यक्ती देखील बऱ्याचवेळी अनेक कार्यक्रमांमध्ये त्याची आठवण हमखास काढतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *