‘लग्नाची बेडी’ फेम सिंधूच्या बहिणी दिसतात खूपच सुंदर; करतात हे काम

पुणे | लग्नाची बेडी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने अल्पावधीत लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेतील सर्वच पात्र उत्तम अभिनय करत आहेत. त्यामुळेच या मालिकेचा टीआरपी देखील पहिल्या पाचमध्ये येतो.

या मालिकेतील सिंधू ही प्रमुख अभिनेत्री आहे. तिची बोलण्याची पद्धत आणि सर्वांबरोबर वागण्याची पद्धत पाहून प्रेक्षक तिच्यावर खुप प्रेम करतात. मालिकेत हे पात्र अभिनेत्री सायली देवधर साकारत आहे. या बातमीमधून सायली आणि तिच्या कुटुंबातील तिच्या बहिणींची अधिक माहिती जाणून घेऊ.

२८ जून १९९० रोजी सायलीचा जन्म झाला. तिचे बालपण पुण्यातच गेले. शालेय आणि माविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिला अभिनय क्षेत्रात रुची निर्माण झाली होती. सुरुवातीला तिने शाळेत आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्क्रमांसाठी एक पात्री अभिनय करायला सुरुवात केली. हळूहळू तिने आपला मोर्चा व्यावसायिक नाटकांच्या दिशेने घेतला.

त्यानंतर तिने अनेक नाटक आणि एकांकिका स्पर्धेत भाग घेतला. आपल्या अभिनयाला आणखीन सुंदर बनवत तिने मालिका विश्वात पदार्पण केले. सध्या ती लग्नाची बेडी या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत येण्या आधी तिने काही चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. सॉरी, जब से दिल को तू मिला है, मिस मॅच, ब्लॅक बोर्ड अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने सह कलाकार म्हणून काम केले आहे.

चित्रपटातील तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची मोठी दाद देखील मिळाली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. ती आता आपल्या कारकीर्दीत मोठी झेप घेत आहे. सायली सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. आपल्या अनेक रील व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. यावर चाहते नेहमीच लाइक्स आणि हार्ट इमोजिचा वर्षाव करतात.

तिच्या फॅमिली अल्बम मधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यात तिच्या दोन बहिणी देखील दिसत आहेत. सिद्धी आणि कल्याणी अशी तिच्या दोन्ही बहिणींची नावे आहेत. सायलीने नवरी मिळे नवऱ्याला, जुळून येती रेशीमगाठी यामधे देखील महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत.

सायलीच्या दोन्ही बहिणी दिसायला खूप सुंदर आहेत. त्यातील मोठी बहीण सिध्दी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सायलीच्या दोन्ही बहिणी तिच्या पेक्षाही अधिक सुदंर आणि हॉट दिसतात. तिची मोठी बहीण देखील अभिनय क्षेत्रातील आहे. सायली नेहमी आपल्या आदर्श व्यक्तींमध्ये तिच्या मोठ्या बहिणीचे नाव घेते.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *