कॉफी विथ करण पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात

मुंबई | सतत वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असलेला सिनेविश्वातील एक व्यक्ती कोण असं म्हटलं तर करण जोहर हे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. कारण करण जोहर हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्याला सर्वांनाच तोंड द्यावे लागते.

त्याने केलेल्या प्रत्येक कामावर, त्याच्या प्रत्येक प्रश्नावर, त्याच्या प्रत्येक वक्तव्यावर एकंदर त्याच्या सर्व वागणुकीवर लोक त्याला नेहमी प्रश्न विचारत असतात. अनेक वेळा त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केलं जातं. त्यामुळे त्याला सतत लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.

अशात आता करण जोहरचा कॉफी विथ करण हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे हे नवीन पर्व असून याचे दोन एपिसोड पार पडलेत. अशात दुसऱ्या एपिसोडमध्ये करण कडून एक मोठी चूक झाली आहे. याच चुकीमुळे त्याला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. या शोमध्ये नेमकं करणने काय चुकीचं काम केलं आहे हे जाणून घेऊ.

कॉफी विथ करण या शोच्या दुसऱ्या भागात जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोन अभिनेत्री आल्या होत्या. त्यावेळी करणेने जान्हवीला जास्त मदत केली असं दिसलं. संपूर्ण शो मध्ये तो साराला डावलत होता. तिच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता. म्हणजे तो तिच्याशी बोलत होता मात्र तो जानवीला जास्त फेवर देत होता. त्याच्या याच चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर आता ट्रोल केलं जात आहे.

अशात नुकताच करण माध्यमांसमोर आला. ‘लाईगर’ या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज वेळी त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्याला कॉफी विथ करण या शोमध्ये साराला दिलेल्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी यावर त्याने एक मोठं धक्कादायक उत्तर दिलं. त्याचे हे उत्तर ऐकून अनेक जण आता त्याला खोटारडा देखील म्हणत आहेत.

करणने सांगितलं की, ” शो सुरू असताना जान्हवी दोन खेळांमध्ये हारली होती. मात्र साराने दोन्ही खेळ जिंकले होते. त्यामुळे जान्हवी थोडी अपसेट होती. तिला ठीक वाटावं म्हणून मी तिच्या बाजूने बोलत होतो. सारा आणि जानवी या दोघींना मी लहानपणापासून ओळख. मी त्या दोघींवरही समान प्रेम करतो.

त्या दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत. लोक काय बोलतात याचं मला दुःख होतं. मात्र मी त्यांना कधीच थांबवू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो.” असं त्याने सांगितलं होतं.

करण जोहरहा तृतीय पंथी असल्याने देखील त्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. तो अजूनही सिंगल आहे त्यांना लग्न केलेले नाही. मात्र त्याला दोन जुळी मुलं आहेत. कारण या दोन्ही मुलांचं खूप छान पद्धतीने संगोपन करतो. सरोगसीच्या माध्यमातून त्याने या मुलांना जन्म दिला आहे. अशात या कारणावरून देखील त्याच्यावर नेहमी टीका केली जाते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *