अमृता फडणवीस यांना मामी म्हटल्यावर काय वाटतं जाणून घ्या?

मुंबई | अमृता फडणवीस या नेहमीच लाईमलाईटमध्ये दिसतात. अशात त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. नुकतेच त्यांनी आपल्याला मामी म्हटल्यावर काय वाटते यावर एक प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाबरोबर हात मिळवणी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सतत काही तरी बदल होताना दिसत आहेत. अशात राजकीय मंच असो अथवा मनोरंजनाचा मंच असो त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या अनोख्या अंदाजात उत्तरे देताना दिसतात.

नुकताच झी मराठी या वाहिनीवर बस बाई बस हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपल्याला अमृता फडणवीस आलेल्या दिसणार आहेत. इथे येऊन त्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करणार आहेत. तसेच तिथल्या बायकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

अशात या शोचा नुकताच एक प्रोमो व्हिडिओमध्ये समोर आला आहे. यामध्ये एक महिला अमृता यांना विचारतात की, देवेंद्रजीना माननीय मुख्यमंत्री म्हणजेच मामू म्हणतात आणि तुम्हाला मामी, मग तुम्हाला असं मामी म्हटल्यावर तुम्हाला कसं वाटतं बर. या प्रश्नावर उत्तर देताना अमृता हसत म्हणतात की, मला तर खूप छान वाटत.

बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करताना देखील दिसणार आहेत. तसेच त्यांच्या मनातील अनेक गोष्टी त्या देवेंद्र यांना सांगणार आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती.

त्यावेळी त्यांनी देखील बायकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत सांगितले होते की, मी माझ्या घरी शिंदे विरुद्ध पवार असं नेहमी चिढवते. कारण माझी आई शिंदे आणि बाबा पवार असं त्यांनी सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातील एक दिग्गज महिला या कार्यक्रमात येणार असल्याने अनेकजण हा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सदर कार्यक्रम हा ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *