प्रेमात अडथळा येत असल्याने भर दिवसा फिल्मी स्टाईलने तरुणाचा खून; घटना वाचून अंगावर काटा येईल

पुणे | आजवर तुम्ही खूण, हत्या, चोरी, अपहरण अशी प्रकरणे असलेल्या अनेक वेब सिरीज, चित्रपट, मालिका पहिल्या असतील. या सर्व गोष्टी काल्पनिक असतात. खऱ्या आयुष्यात अशा पद्धतीने खून करणे किंवा अन्य कोणतीही गोष्ट करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र सध्याच्या घडीला तरुणाई आपल्या मनासारखे होण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचीच प्रचिती पुण्यात आली आहे. इथे एका मुलाने प्रेमात व्यत्यय अनात असलेल्या मुलाचा फिल्मी स्टाईलने खून केला आहे.

पुण्यातील खराडी येथे राहणाऱ्या तरुणाला गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. प्रेमात अडथळा येत असल्याने त्या मुलाचा खून करण्यात आला आहे. या घटनेने खराडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तो मुलगा सकाळी कचरा वेचण्यासाठी घराबाहेर पडला असता त्याच्यबरोबर हा प्रकार घडला. पुणे सारख्या विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या शहरात ही घटना घडली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने हत्या करण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत.

अक्षय प्रकाश भिसे ( २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनकर पठारे वस्ती, खराडी येथे हा तरुण राहत होता. तो नेहमीप्रमाणे घरातून रोज सकाळी कचरा उचल्यासाठी निघाला होता. मात्र दोन युवकांनी सकाळी त्याच्यावर नेम धरून गोळ्या झाडल्या. सदर प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत दोघांना सोलापूर येथून शोधून काढले आहे. तसेच त्यांना अटक केली आहे. संतोष सत्यवान शिंदे (२८) आणि संग्राम उर्फ बाबू राजू बामणे असे अटक झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघे देखील कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर येथील मूळचे रहिवासी आहेत.

सदर घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चार या पथकाने या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास वेगात सुरू आहे. सदर खुनाची घटना ही २१ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. सकाळी कचरा वेचत असताना दोघांनी अक्षयवर गोळीबार केला. चंदन नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या टीमने तपास करत असताना घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी हत्येची पूर्ण घटना त्यांना यात दिसली. त्यानंतर सोलापूर येथून दोघांना अटक करण्यात आली.

या दोघांनी ही हत्या करण्याआधी मोबाईल फोनमध्ये खुनाचे अनेक चित्रपट, मालिका आणि सिरीज पाहिले होते. ते सर्व पाहूनच त्यांच्या डोक्यात देखील ही कल्पना आली. त्यांनी आंध्र प्रदेशातून पिस्तूल विकत घेतले आणि अक्षयचा खात्मा केला. ही सर्व माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी दिली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *