अभिनेते रणजित यांची मुलगी दिसते खुपचं सुंदर; करते ‘हे’ काम

दिल्ली | बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि अफाट गाजलेल्या नावांमध्ये रणजीत हे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. बॉलीवूड चित्रपटांमध्ये फक्त नायक नाही तर खलनायक देखील अभिनयात दमदार असावा लागतो. अशात त्या काळी खलनायका शिवाय काहीच नाही असे गणित होते. नायकाला हिरो बनवण्यात खलनायकाचाही मोठा वाटा असतो.

खलनायक आणि नायक यांच्यात भांडण होत राहते आणि अनेक वेळा नायक हा खलनायकाच्या मुसक्या आवळताना दिसतो. तसं पाहिलं तर खलनायक नायकाला बरोबरीची स्पर्धा देतो. बॉलिवूडचा असाच एक खलनायक म्हणजे रणजीत, जे अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसले आणि त्यांनी मोठ मोठ्या कलाकारांची पळता भुई थोडी केली. एक काळ असा होता की लोक रणजित यांच्या नावानेच घाबरायचे.

रणजीत खऱ्या आयुष्यात मत्र एकदम वेगळे होते. तर या बातमीतून आज याच अवलियाच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत. दिव्यांका बेदी ही रणजीत म्हणजेच गोपाल बेदी यांची मुलगी आहे. ती इतर स्टार किड्ससारखी हेडलाईन्स आणि लाईमलाईट मध्ये सतत येत नाही, पण सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. दिव्यांका खूपच सुंदर आहे आणि लूकमध्ये ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही.

रणजीत यांची मुलगी ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित आहे. दिव्यांका ही रणजीत आणि अलोका बेदी यांची कन्या आहे. ती पेशाने एक फॅशन डिझायनर आहे. ती अनेक सेलिब्रिटींसाठी कपडे डिझाईन करते. दिव्यांका बेदी ही फॅशन डिझायनर तसेच ज्वेलरी डिझायनर देखील आहे. दिव्यांकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या डिझाइनिंगचे आणि एकंदर सर्व कामाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

दिव्यांका तिच्या लुकवर खूप लक्ष देते. ती फिटनेस साठी वेडी आहे. दिव्यांकाला गिगी नावाने देखील ओळखले जाते हे तिचे टोपण नाव आहे. तिचे इंस्टाग्रामवर देखील हेच नाव आहे. पापा रणजीत व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यही तिला याच नावाने हाक मारतात.

ती एकदम तिच्या वडिलांवर गेली आहे. रणजीत यांना एक मुलगा देखील आहे. त्याच नाव चिरंजीवी बेदी असं आहे. दिव्यांकाचा बॉयफ्रेंड डॅनियल मॅकली आहे. ती बॉयफ्रेंड बरोबर देखील सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकतेच हे दोघे एका ठिकाणी फिरायला गेले होते. यावेळी तिने तेथील अनेक फोटो चाहत्यांना शेअर केले.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *