भावाचा निधनानंतर केतकीची भाऊक पोस्ट; म्हणाली….

मुंबई | अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाने १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यावेळी चाहते केतकीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. बऱ्याच व्यक्तींना या बातमीवर विश्वास ठेवण्यास देखील नकार दिला होता. कारण केतकिने काहीच स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. अशात आता १५ दिवसांनंतर तिने तिचं मौन तोडलं आहे. तिने आता आपल्या भावाच्या निधनावर एक पोस्ट शेअर केली आहे.

केतकीने आपल्या चुलत भावा बरोबरचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात तिचा भाऊ सुर लावताना देखील दिसतो आहे. केतकीच्या भावाने नोकरीत अपयश आल्याने आत्महत्या केली होती. केतकीच्या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, “माझा अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, मल्टी टॅलेंटेड, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको लिहू, 21 वर्षांच्या आठवणी काही शब्दात कशा लिहू?

हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते क्षण धुसर होता कामा नये. किती आणि केवढ्या आठवणी..अक्षु तुझा समजुतदारपणा, तुझी बुद्धिमत्ता अतुलनीय होती. तरी एक गोष्ट तुझी केतकी ताई म्हणून सांगते, आयुष्यात कुठली ही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार आपल्या स्वत:पेक्षा मोठे नसतात. ते होऊ द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांचं अस्तित्व असतं.

तू आम्हांला सोडुन गेलास पण आयुष्यभर एक गोष्ट तू आमच्या सोबत आहेस ह्याची जाणीव करुन देत राहिल.. ते म्हणजे तुझं गाणं! तुझं अप्रतिम गाणं. तुझं घरी आले की गोड हसून मिठी मारणं, कधीही तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि चित्रपट किंवा मॅच चालु असेल तरी तुझं प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणं मिस करतेय मी. आसं वाटतं की आत्ता आले घरी की अमोल चाचा हार्मोनियम घेईल, तू तानपुरा लवशील आणि आपन गायला बसू. सगळं पूर्ववत… रोज सकाळी उठले की क्षणभर असं वाटून जातं आणि मग लगेच परिस्थिती मला वास्तवाचं भान करुन देते.

मी हे वाक्य तुझ्यासाठी लिहेन असं वाटलं नव्हतं कधी पण.. तू जिथे कुठे असशील, अशी कल्पना करतेय की तू गात असशील, आनंदी असशील, तू कायम आमच्या मिठीत, आमच्यासोबत राहशील. आम्ही ५ कायम एकत्र असू. तू, आकांक्षा अम्मू, चाय आणि मी. माझे प्रेम कायम तुझ्यासोबत राहील. मिस यू अक्षु. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. – केतकीताई.” असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. केतकीच्या भावाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. नंतर त्याने एका कंपनीत इंटर्शिप केली. मात्र तरी देखील त्याला नोकरी मिळत नव्हती. तो खूप नैराश्यात गेला होता. त्यामुळेच त्याने आपले जीवन संपवले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *