“कौन बनेगा करोडपती” या चिमुकल्याने जिंकले १ कोटी रुपये, आता झाला आयएएस अधिकारी…..!

पुणे | “कौन बनेगा करोडपती” हा कार्यक्रम सर्वच व्यक्ती ज्ञानात भर पडावी म्हणून पाहत असतात. अशात यामुळे बिग बीं बरोबरच हॉट सीटवर बसलेली प्रत्येक व्यक्ती प्रसिध्दी झोतात येते. इथे आल्यावर अनेक व्यक्ती प्रश्नांची उत्तरे देऊन कोटींची रक्कम जिंकतात. यात अनेकांच्या भुवया उंचावनाऱ्या कहाण्या देखील समोर येतात. अशात साल २००१ मध्ये करोडपती झालेला एक युवक आता पुण्या एकदा मोठ्या चर्चेत आला आहे.

साल २००१ मध्ये “कौन बनेगा करोडपती” या कार्यक्रमात थोडा बदल करून इथे थोडा बदल करून “KBC ज्युनिअर” हा शो सुरू होता. इथे अनेक विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमावले. त्यातील एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने सलग न चुकता १५ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली, आणि तो एक कोटींचा मालक झाला. सदर युवकाने आता पुन्हा एकदा आपल्या आई वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे.

रवी सैन असे त्या युवकाचे नाव आहे. त्याने आता आयएएस अधिकारी पदाला देखील गवसणी घातली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना आनंदाचा पारावार उरला नाही. शाळेत असताना पासूनच रवी अभ्यासात खूप हुशार होता. त्याचे वडील सैन्य दलात आल्याने त्याला देखील देश सेवा करण्याची इच्छा होती. त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण करून १२ वी देखील उत्तम गुणांनी पास झाला. त्यानंतर एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी त्याने जयपूरच्या एका महाविद्यालयात दाखला घेतला. इथे त्याने मन लावून अभ्यास केला. पुढे UPSC परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला.

साल २०१२ मध्ये त्याने अभ्यासाला सुरुवात केली. त्याव्या पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. मात्र हार न मानता त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि पुन्हा एकदा परीक्षा दिली. यात तो ४६१ वा रँक मिळवत उत्तीर्ण झाला. साल २०१४ मध्ये त्याने या यशाला गवसणी घातली. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. आता तो एक आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

“कौन बनेगा करोडपती” या शोचा १४ वा सिजन लवकरच सुरू होतं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. आधीच्या पर्वातील अनेक गोष्टी आणि अनेक स्पर्धक व्हायरल होतं आहेत. त्यातच रवीची मेहनत देखील व्हायरल झाली. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा त्याच्या बुध्दीची चतुराई आणि हुशारी पाहायला मिळाली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *