‘काटा रुते कुणाला’ फेम स्नेहा लवकरच झळकणार हिंदी मालिकेत

मुंबई | बिग बॉस हा सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम असला तरी इथे आलेल्या प्रत्येक कलाकाराचे नशीब उजळते. अनेक कलाकारांचे करिअर ठप्प पडलेले असल्यास ते बिग बॉसच्या घरात येतात. इथे आल्यावर त्यांना पुन्हा एकदा नवीन ओळख मिळते तसेच त्यांना काम देखील मिळते. त्यातीलच एक अभिनेत्री स्नेहा वाघ.

“काटा रुते कुणाला” या मालिकेतून प्रसिध्दी झोतात आलेली अभिनेत्री स्नेहा वाघ आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती आपल्याला एका हिंदी मालिकेत दिसणार आहे. स्नेहा काटा रुते कुणाला या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. मात्र त्यानंतर ती अभिनयापासून दुरावली.

अशात बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात ती आली होती. इथे ती खूप छान खेळली. मात्र काही दिवसांनी तिला या घरातून बाहेर जावं लागलं. मात्र त्यामुळे तिची प्रसिध्दी वाढली आणि तिला एका हिंदी मालिकेची ऑफर मिळाली आहे. मोठ्या ब्रेक नंतर आता ती स्टार भारतच्या “ना उम्र की सीमा हो” या मालिकेत कास्ट केले आहे. इथे ती आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे.

“ना उम्र की सीमा हो” या मालिकेत स्नेहा अम्बा हे पात्र साकारणार आहे. आता पर्यंत ती सध्या आणि सोज्वळ भूमिकेत दिसली होती. मात्र अता ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेमध्ये तिच्याबरोबर
रचना मिस्री आणि इक्बाल खान हे कलाकार अभिनय करताना दिसतील. तसेच समिधा गुरू आणि वर्षा दंडाले यांच्या या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहेत. सदर मालिका २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे.

काटा रुते कुणाला या मालिकेमुळे स्नेहा खूप प्रसिद्ध झाली होती. या मराठी मालिके बरोबरच तिने ‘मेरे साई’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘एक वीर की अर्दास वीर’ या हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनय केला होता. काटा रुते कुणाला या मालिकेच्या शूटिंग वेळेस तिचं वैवाहिक आयुष्य चर्चेत आलं होतं.

अविष्कार बरोबर लग्न केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास देण्यात आला होता. या संदर्भात तिने कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. अविष्कार आणि स्नेहा या दोघांच्या नात्याचे पडसाद बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात देखील पाहायला मिळाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *