तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चेवर स्वतः करीनाने दिले उत्तर, म्हणाली…

मुंबई | बॉलीवूडची बेबो सेफ बरोबर सध्या लंडनला सुट्ट्या एन्जॉय करते आहे. अशात तिथे गेल्यावर तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये ती खूप मजा मस्ती करताना दिसली. मात्र एका फोटोमध्ये तिचा मोठा बेबी बंप दिसला. यावरून एकच चर्चा रंगली. करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे असं सगळे म्हणू लागले. तुम्ही तिचा तो फोटो पाहिला तर तुम्हाला देखील ती प्रेग्नेंट आहे असेच वाटेल. कारण यामध्ये तिचं पोट खूप मोठ दिसत आहे.

मात्र करीनाने हे सर्व ऐकून यावर आता स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ती प्रेग्नेंट असल्याची माहिती फेटाळून लावली आहे. त्यामुळे तिची आणखीनच चर्चा होत आहे. तिने अगदी मजेशीर रित्या ती माहिती खरी नसल्याचं म्हटल आहे. सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ” मी प्रेग्नेंट नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे, आणि माझ्या मते सैफने आधीच या देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दील आहे. ”

तिची ही परखड आणि थोडी मजेशीर प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे. मात्र अनेक व्यक्तींना अजूनही हे खर वाटत नाही. कारण आधीच्या फोटोमध्ये तिचा बेबी बंप खूप मोठा दिसतो आहे. त्यामुळे करीनाने ही गोष्ट नाकारली असली तरी बऱ्याच व्यक्तींना यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. करीनाने सैफ बरोबर लग्न केल्यावर या दोघांना तैमूर हा मुलगा झाला. त्या नंतर या दोघांना आणखीन एका बाळाला जन्म दिला. त्याच नाव जेह अस आहे.

करीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगते. सध्या ती अभिनयापासून दूर आहे. आपल्या मुलांच्या संगोपनात ती व्यस्त आहे. असे असले तरी बॉलिवूडच्या बेबोने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेहमी हिट ठरतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *