करण जोहर वादाच्या भोवऱ्यात; कार्यक्रम चालू असताना केले विचित्र काम…

मुंबई | कॉफी विथ करण या शोची लोक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अशात आता या शोचे ७ वे पर्व सुरू झाले आहे. सातवे पर्व सुरू होताच सगळीकडे याची चर्चा रंगली आहे. कॉफी विथ करण हा शो नेहमीच वादाच्या कचाट्यात असतो. याचे सर्व पर्व वादाने भरलेले आहेत. अशात या पर्वात देखील वाद होणार हे नक्की होतं. मात्र हा वाद खूपच लवकर सुरू झाला आहे.

कॉफी विथ करण सुरू होताच सुरुवातीस कॉफी पियायला आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करायला कोण येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. यामध्ये आलिया आणि रणवीर सिंग ही जोडी पाहिले आली. यावेळी रणवीर आणि आलिया या दोघांची मैत्री समोर आली. गली बॉय या चित्रपटातील दोघांच्या भूमिकेमुळे चाहत्यांना ही जोडी खूप आवडते. त्यामुळे आता ही जोडी रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाने या शोमध्ये तिच्या लग्नाच्या अनेक गमतीजमती देखील सांगितल्या आहेत.

पहिला भाग तर छान झाला. त्यानंतर दुसऱ्या भागात सारा अली खान आणि जान्हवी कपूर या अभिनेत्रींनी हजेरी लावली. यावेळी दोघींनी खूप मस्त आऊटफिट घातले होते. दोघीही सुंदर आणि हॉट दिसत होत्या. त्यांनी देखील करणच्या प्रश्नांची मस्त उत्तरे दिली. अशात यातील एका प्रश्नावर कॉपीराइट लागला आहे. मान्या लोहित अहुजाने सोशल मीडिया वरती पोस्ट करत करण जोहरच्या शोवर कंटेंट चोरी केल्याचा दावा केला आहे.

शो मध्ये रॅपिड फायर प्रश्नांची सुरुवात झाली. त्यानंतर करणने त्याच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न विचारला त्याच्या याच प्रश्नावर चोरीचा दावा केला गेला आहे. प्रश्न असा होता की, ” एक असा व्यक्ती जी आपल्या बुटांची लेस सुधा बांधू शकत नाही आणि एक दिवस तो आईला सर्व सांगतो?”

कॉलिंग ऑल बॉलीवूड बफ्स: गेस द मूव्ही विथ द हेल्प ऑफ देअर बॅडली एक्स्प्लेन्ड प्लॉट्स नावाच्या लेखामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे यावर आरोप लावला आहे. यामुळे मान्या लोहित आहुजाने आपल्या पोस्ट शेअर करत लिहले आहे की, ‘कॉफी विथ करण’ ने माझी कल्पना उचलली, जी मी IDiva वर सुरू केली होती.

ही माझी कल्पना होती आणि ते लिहिताना खूप मजा आली, पण मला याबद्दल श्रेय दिले नाही. हे मला मान्य नाही. तुम्ही जर कोणाचा कन्टेन्ट घेत असाल तर त्याचे श्रेयही द्या.” असं त्याचं म्हणणं आहे. तसेच त्याने ही पोस्ट शेअर करत करण जोहर, स्टार वर्ल्ड, डिस्ने + हॉटस्टार आणि श्रीमी वर्मा यांना टॅग केले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *