कहाणी घर घर की, पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | मनोरंजन विश्वात अनेक मालिका येतात यातील काही मालिका हिट ठरतात तर काही फ्लॉप होतात. अशात काही मालिका या अशा असतात की, त्यांची छाप वर्षानुवर्षे कायम राहते. त्यातीलच एक मालिका म्हणजे “कहाणी घर घर की” या मालिकेने मालिका विश्वात त्या काळी स्वतः चे मोठे वर्चस्व प्रस्थापित केले होते.

आजही या मलकेचे कथानक गाजते. आजही अनेक व्यक्तींच्या मनावर या मालिकेची छाप कायम आहे. या मालिकेची कथा आणि यातील कलाकार खूप छान होते. त्यामुळेच या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

तब्बल 8 वर्षे ही मालिका मोठ्या टीआरपी बरोबर सुरू होती. मालिका साल 2000 मध्ये सुरू झाली होती आणि 2008 मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशात आता तब्बल 14 वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेत असलेले सर्व कलाकार देखील मालिकेमुळे खूप प्रसिद्ध झाले. मिळालेल्या माहितीनुसार एकता कपूरची ही मालिका पुन्हा एकदा नव्या दमात सुरू होत आहे. यासाठी आता स्टार निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. मालिकेत नवीन कलाकारांना संधी दिलेली दिसेल.

कहाणी घर घर की, या मालिकेत साक्षी तंवरने पार्वती हे पात्र साकारले होते. मालिकेच्या चाहत्यांना पुन्हा एकदा साक्षीला पार्वती साकारताना पाहण्याची इच्छा आहे. मात्र असे असले तरी या बाबत अद्याप अधिकृत‌ माहिती समोर आलेली नाही. एकता कपूर किंवा अन्य कोणीही या विषयी माहिती दिलेली नाही. मात्र तरी देखील ही मलिका सुरू होणार ही खबर पक्की असल्याचे म्हटले जात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *