फक्त ९ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका; अन् पुढे जे घडलं ते…

सोलापूर | सध्या तरुणाई फास्ट पुढच्या जास्त आहारी गेली आहे. त्यामुळे अनेक तरुण मुला-मुलींना हृदयविकाराचा झटका आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. खरंतर तरुण मुला-मुलींचे हृदय हे अतिशय सुदृढ असते मात्र अशा पद्धतीच्या पदार्थांचे सेवन केल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

यामध्ये वृद्ध व्यक्तींना बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका येऊन मरण येते. मात्र सोलापुरात एक अचंबित करणारी घटना घडली आहे. इथे एका चिमुकलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. हृदयविकाराचा झटका येऊन ती खाली कोसळली.

सोलापुरातील या घटनेने सर्वजण चकित झाले आहेत. अवघ्या ९ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उपचारादरम्यान या मुलीचे हृदय अगदी 65 वर्षांच्या वृद्ध व्यक्ती इतके वृद्ध झाल्याचे दिसले आहे. चक्कर येऊन खाली पडल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता ९ वर्षांच्या मुली बाबतचा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

यावेळी मुलीच्या वडिलांनी सांगितले की, अवनी इतर मुलांबरोबर खेळत होती. खेळत असताना तिला श्वास घ्यायला थोडा त्रास झाला. त्यानंतर तिच्या छातीत कळ आली. त्यामुळे तिला घेऊन दवाखाना गाठला. यावेळी डॉक्टरांनी तिच्या वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगितले. या सर्व टेस्ट करत असताना तिला एका रोगाचे निदान झाले. हायपकोलेस्ट्रोलमिआ या आजाराने ही चिमुकलीग्रस्त आहे. या आजारामुळेच तिला चक्कर आली तसेच तिला हृदयविकाराचा झटका देखील आला.

खेळता खेळता खाली पडल्याने तिचे आई वडील फार घाबरले होते. छातीत दुखतय असं म्हटल्यावर त्यांनी मुलीला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल केले. मुली वरती उपचार करत असताना तिला झालेल्या रोगाचे निदान पाहता डॉक्टर देखील चकित झाले आहेत.

कारण या चिमुकलीला 65 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीप्रमाणे हृदय आहे. त्यामुळे तिला हृदयविकाराच्या झटक्याचा त्रास झाला. तिच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल खूप जास्त वाढलेली आहे. ती कंट्रोलमध्ये ठेवणे फार गरजेचे आहे. असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तिला हा आजार अनुवंशिक असल्याचे ते म्हणाले.

अवनी वरती बायपास सर्जरी देखील केली गेली. एवढ्या कमी वयात तिला हे सर्व पहावे लागले. त्यामुळे तिचे कुटुंबीय फार चिंतेत आहेत. मात्र अवनी आता हळूहळू ठीक होत आहे. तिला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. डॉक्टरांनी तिला काही औषधे लिहून दिली आहेत.

तिला आता आयुष्यभर औषधे खात दिवस काढावे लागणार आहेत. औषधे बंद केल्यास तिला पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो असे डॉक्टर म्हणालेत. मात्र जर तिने हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू ठेवल्यास ती इतर लहान मुलांप्रमाणे सामान्य आयुष्य जगू शकते. तिला हवं तेवढं ती खेळू शकते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *