चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी जिगरबाज आईने जळत्या बसमधून घेतली उडी! सांगितला थरारक प्रसंग…

 

नाशिक: आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय खराब बातमीने झाली. औरंगाबाद रोडवर भी षण अप घात झाला. या अप घातात १२ लोकांचे आगीत जळून मृ त्यू झाला. ट्रक आणि बसच्या धडकेत इंधनाच्या टाकीने स्फो’ट घेतला. या स्फो’टामध्ये बसला भीष’ण आग लागली.

बसमधून प्रवास करणाऱ्या १२ प्रवाशांचे या आगीमध्ये नि’धन झाले. तर ३८ प्रवासी जखमी झाले असून आता त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेवर सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास सर्वच नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटनेमध्ये पूजा मनोज गायकवाड यादेखील प्रवास करत होत्या. मूळच्या वाशिम जिल्ह्याच्या रहिवासी असणाऱ्या पूजा त्यांच्या दोन्ही मुलांसह आणि 19 वर्षांच्या मामे भावासोबत मुंबईला निघाल्या होत्या. त्यांच्या दोन्ही मुलांचे वय अवघे आठ आणि दोन वर्ष आहे. सुदैवाने या दुर्घटनेतून पूजा बचावल्या.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाबद्दल बोलताना पूजा यांनी सांगितलं, ‘माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन मी माझा भाऊ गणेश सोबत प्रवास करत होते. चालकाच्या बाजूने तीन क्रमांकाच्या सीटवर आम्ही बसलेलो होतो. मुलांसोबत मला देखील पहाटेची साखर झोप लागलेली होती. आणि त्यातच अचानक बसला समोरून मोठा ट्रक येऊन धडकला. बसमधील आम्हा सर्वांना मोठा हादरा बसला आणि आम्ही सर्वच खडबडून जागे झालो.

तोच क्षणात बसला भी’षण आग लागली आणि टायर फुटल्याचा आवाज आला. संपूर्ण बस मध्ये प्रवाशांची रडारड आणि आक्रोश सुरू होता. काहीच वेळात बसला पाठीमागून देखील आग लागली आणि त्यामुळे मागील प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. माझा भाऊ दरवाजाकडे धावला मात्र दरवाजा कोणालाच उघडता येत नव्हता.

अखेर बसच्या खिडकीची काच फोडली आणि त्यानंतर भाऊ सर्वात पहिले खाली उतरला. मी माझ्या दोन्ही चिमुकल्यांना त्याच्याकडे खिडकीतून बाहेर सोपवले. ते सुखरूप खाली उतरल्याच्या नंतर मी देखील खिडकीतून उतरले. याचवेळी काही स्थानिक लोक देखील मदतीला धावून आले. आम्ही आमच्या डोळ्यांसमोर क्षणात बसला आगीत कोळसा होताना पाहिले.

काळ आला होता पण, दैव बलवत्तर असल्याने आम्ही या भीषण अपघातातून वाचलो. आमच्या सोबत प्रवास करणारे सहप्रवासी जळून खाक झाले. माझ्या आयुष्यातील घडलेला हा सर्वात वाईट प्रसंग जो माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. सुदैवाने माझे दोन्ही मुलं आणि भाऊ या अपघातातून वाचले याचा मला समाधान आहे.’

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *