तारक मेहता मालिकेतून जेठालालची एक्झीट

मुंबई | मालिका विश्वात दरवर्षी नवनवीन मालिकांची एन्ट्री होत असते. अशात जुन्या मालिकांकडे अनेक प्रेक्षक पाठ फिरवताना दिसतात आणि नवीन मालिकांकडे आकर्षित होताना दिसतात. मात्र आपल्या मार्गात येणाऱ्या सर्वच नवीन मालिकांना मागे टाकत गेल्या तब्बल 14 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका आपले स्थान आणि वर्चस्व कायम टिकवून उभी राहिलेली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये सर्वच पात्र ही वर्षानुवर्षे या मालिकेमध्ये कार्यरत आहेत. मात्र कोरोना काळानंतर या मालिकेच्या आनंदाला आणि भरभराटीला कुणाची तरी नजर लागली आहे?असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत.

असित मोदी दिग्दर्शित आणि निर्मित या मालिकेची उतरती कळा सुरू झालेली दिसत आहे. सुरुवातीला दयाबेनने या मालिकेला राम राम ठोकला. त्यानंतर या मालिकेतील कणा असलेले तारक मेहता यांनी देखील मालिकेकडे पाठ फिरवली. दिशा वकानीने प्रेग्नेंसी साठी या मालिकेतून ब्रेक घेतला होता. दिग्दर्शक ती परत येण्याची खूप वाट पाहत होते. मात्र दोन वर्षे वाट पाहिल्यानंतरही परत येण्याचा तिचा निर्णय नसल्याने ते आता तिची रिप्लेसमेंट शोधत आहेत. तसेच तारक मेहता हे पात्र शैलेश लोढा साकारत होते. निर्माते तारक मेहताची देखील रिप्लेसमेंट शोधत आहेत.

हा सर्व ताप डोक्याला कमी होता की काय त्यात आणखीन एक गोंधळ झाला आहे. मालिकेतील जेठालाल हे मालिका सोडत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. प्रेक्षक यामुळे पूर्णतः चक्रावले आहेत. सर्वच मुख्य पात्र या मालिकेमधून निघून गेल्यानंतर या मालिकेला काहीच चव उरणार नाही असं अनेक जण म्हणत आहेत. या सर्व गोंधळात जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे अमेरिकेला जात असल्याचे म्हटले जात आहे. आता खरोखरच ते देखील ही मालिका सोडणार का अशी चिंता चाहत्यांना लागलेली आहे.

या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये दाखवण्यात आले की, नट्टू काका आणि बागा हे दोघे जेठालालला सरप्राईज देण्याचं ठरवतात. ज्यावेळी जेठालाल दुकानामध्ये जातो तेव्हा हे दोघे अचानक त्याच्या समोर डान्स करू लागतात. त्यामुळे जेठालाल वैतागतो. तसेच काहीतरी वेगळे घडणार आहे याची त्याला कल्पना मिळते. त्यामुळे जेठालाल दोघांना देखील नेमके काय झाले आहे हे खोदून खोदून विचारत असतो. यावेळी सरप्राईज असे ओरडत नटू काका आणि बागा जेठालालला अमेरिकेला जाण्याचे तिकीट दाखवतात. यावर जेठालाल खूप खुश झालेला दिसत आहे.

त्यानंतर मालिकेच्या पुढील भागामध्ये काय होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच याच भागामुळे जेठालाल आता अमेरिकेला का जात आहे? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. इतर कलाकारांप्रमाणे जेठालाल देखील या मालिकेतून एक्झिट घेणार का असे अनेक जण म्हणत आहेत.

या सर्वांमध्ये जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी हे मालिकेमध्ये पुढील भागात दिसतील का की मालिकेला मिळालेला हा नवा ट्विस्ट जेठालाल यांच्या एक्झिट साठी आहे हे आपल्याला मालिकेच्या पुढील भागांमध्ये समजू शकते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचा पुढील भाग सर्वच प्रेक्षकांसाठी मोठा औत्सुक्याचा ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *