‘जीव झाला येडपिसा’ मालिकेतील अभिनेत्री शर्वरी जोग या अभिनेत्यावर करत आहे जीवापाड प्रेम

मुंबई | मोठ्या पडद्यावरील तसेच छोट्या पडद्यावरील देखील अनेक कलाकार आपली प्रेम प्रकरणे नेहमीच गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. अशात मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री शर्वरी जोग हिने मात्र “प्यार किया तो डरना क्या” याची प्रचिती घडवून दिली आहे. तिने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळे चाहते आता भारावून गेले असून सर्वांच्या आनंदाला पारा उरलेला नाही.

जीव झाला येडापिसा या मालिकेतून शर्वरी नावारूपाला आली. ही मालिका सध्या सुरू नसली तरी, अजूनही यातील स्टोरी आणि कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मालिकेत शिवा आणि सिध्दी या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. तर शर्वरी यामध्ये शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका साकारली होती. तिने या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला होता. त्यामुळेच तिचा चाहता वर्ग अधिक वाढला आहे.

अशात शर्वरी मालिकेत जशी दिसत होती त्याहून अधिक खऱ्या आयुष्यात ती मनाने खूप सुंदर आहे. साधी सरळ आणि प्रत्येक वेळी ती आपल मत परखडपणे मांडत असते. एका कलाकाराबरोबर काही दिवसांपासून तिचं नाव जोडलं जातं होतं. मात्र या सर्वांमध्ये चाहते तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. त्यामुळे चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण तिने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

शर्वरी जोगचे नाव अभिनेता गौरव मालवणकर बरोबर जोडले जात आहे. तिने देखील आता त्याच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट करत आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत असं ठामपणे सांगितले आहे. गौरव मालवणकर आणि शर्वरी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहोत. अनेक वेळा त्यांना सार्वजनिक ठिकाणी स्पॉट केलं गेलं होतं. त्याच्या अफेरची चर्चा एवढी रंगली होती की, सर्व जण या दोघांबद्दल बातचीत करत होते. त्यामुळेच तिने हा खुलासा केला आहे.

गौरव हा देखील मराठी मलिका विश्वात सक्रिय आहे. त्याने फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत काम केले आहे. तसेच शर्वरीच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास तिने जीव झाला येडापिसा या मालिकेसह विधिलिखित या वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे. ती मूळची कोल्हापूरची असून लहानपणापासूनच तिला अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे सुरुवातीला तिने अनेक नाटके आणि एकांकिका देखील केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by sharvari jog💝 (@sharvari_jog)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *