मुलाचा अखेरचा मुका घेत जळगावच्या व्यक्तीची आत्महत्या; कारण वाचून धक्काच बसेल

जळगाव | राज्यात गेली अनेक दिवसांपासून आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना जळगावात घडली आहे. या शहरातील अयोध्यानगर येथे राहत्या घरात गळ्याला गळफास लावून वडिलांनी आयुष्य संपवलं. भागवत शामराव जाधव वय ४८ वर्ष अस मृत व्यक्तीच नाव आहे. घरात सर्वांना कळेल म्हणून भागवत जाधव यांनी बाहेर जाऊन सुसाईड नोट लिहिली.

जळगावातील अयोध्यानगर येथे राहत होते. त्यांना योगेश आणि तेजस अशी दोन मुल होती. तसेच पत्नीचं नाव सुनीता होत. असा त्यांचा संसार होता. जळगावात अजिंठा चौकात त्यांचं भागवत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास पत्नी सुनीता ही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दोन्ही मुल देखील कॉलेजला गेली होती. अशावेळी तेजसला कॉलेजचा फॉर्म भरायचा होता. म्हणून तो घरी आला. अशावेळी त्याला फॉर्म भरण्यासाठी वडिलांनी पैसे दिले आणि शेवटचा मुका घेतला. तेजस फॉर्म भरायला गेला. अशावेळी वडील भागवत जाधव यांनी घराची दोन्ही दार बंद केली.
गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुपारी १२.३० वाजता सुनिता ह्या घरी आल्यावर त्यांना पती भागवत जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. सुनिता जाधव यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिकांनी धाव घेत खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले.
भागवत जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील या तीन जणांची नावे लिहिली आहेत.

काय लिहिली होती सुसाईड नोट ?:
सुसाईड नोटमध्ये भागवत यांनी यात दिनेश मने , बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील यांची नाव लिहिली होती. कंपनीचे मालक पाटील यांनी त्यांच्या ट्रकमध्ये सामान भरून कलकत्ता येथे पाठविण्यासाठी सांगितले. परंतु भागवत जाधव यांनी ट्रकमध्ये माल लोड करू नका असे सांगितले. तेव्हा जबरदस्तीने सामान ट्रकमध्ये भरले. याच्या मोबदल्यात ४५ हजार रूपये ॲडव्हान्स देणार होते. परंतु अद्यापपर्यंत कोणतेही पैसे दिले नाही. ट्रकचे फायनान्सचे हप्तेही चुकले, चार पाच दिवसांपासून झोप येत नाही, त्यामुळे आता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

या तिघांमुळ वडिलांनी आत्महत्या केलं; मुलांनी केला त्या तिघांवर आरोप : दरम्यान, दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील हे गुरूवारी रात्री यांनी वडील भागवत जाधव यांना बोलावून धक्काबुक्की केली होती. तिघांच्या दबावातून वडिलांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मयत भागवत जाधव यांची मुले योगेश, तेजस यांनी बोलताना केला आहे. तिघांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *