शिरके पाटलांच्या घरी जयदीप आणि गौरीचा एकत्र होणार वाढदिवस…

मुंबई | सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेने टीआरपीमध्ये अजूनही नंबर एकचे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे यातील कलाकार आणि या मालिकेची संपूर्ण टीम खूप खुश आहे. आता या मालिकेत लवकरच एक जंगी वाढदिवस साजरा होणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी आणि जयदीप या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. मात्र मालिकेत सतत काही ना काहीतरी गोष्टी घडतात आणि या दोघांमध्ये फूट पडते. आता पर्यंत गौरीने शिरके पाटलांच्या घरासाठी खूप काही केलं आहे. आधी मोलकरीण नंतर सून आणि नंतर मुलगी तर आता याच घराची ती मालिका झाली आहे.

त्यामुळे तिचा रुबाब अधिकच वाढला आहे. अशात जयदीप हा माई दादाचा मुलगा नसल्याने त्याने त्याच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्याची सर्व कामांची जागा गौरीने घेतली आहे. मात्र गौरी आपल्या पतीला सतत त्याला चांगल वाटेल. त्याचा अपमान होणार नाही या गोष्टीची काळजी घेत असते. त्यामुळेच मालिकेतील गौरी सगळ्यांना आवडते.

अशात अम्माने केलेल्या खुलष्यात समोर आले होते की, गौरी ही माई दादांची मुलगी आहे आणि जयदीप हा त्यांचा मुलगा नाही. आता या सर्वांवरून मालिकेत खूप गोंधळ झाला. मात्र आता सर्व काही शांत झाले आहे. अशात या दोघांचा जन्म हा एकाच दिवशी झाला आहे. त्यामुळे लवकरच या दोघांचा एकत्र वाढदिवस साजरा होणार आहे.

येत्या काही दिवसांत मालिकेत या दोघांच्या वाढदिवसाची जंगी तयारी होताना दिसणार आहे. अशात आता या दोघांच्या वाढवशी माई आणि दादा मोठी पार्टी ठेवणार असल्याचं देखील म्हटल जात आहे. मात्र यामधे शालिनी पुन्हा काही घोळ घालणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *