कायतरी चावल्याचा भास झाला, पायही काळा पडला; अन् पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यात पाणी येईल

भंडारा | भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक बातमी घडली आहे. सहा वर्षाच्या एक मुलीचा अचानक मृत्यू झाला. चिमुरडी रात्री आईच्या कुशीत झोपली होती. पायाला काही तरी चावल म्हणून तिचा पाय काळा पडला. यामुळं आई वडिलांनी तिला दवाखान्यात दाखल केलं. काही वेळानं तिचा अचानकपणे मृत्यू झाला. साप चावल्यामुळ तिचा मृत्यू झाला.

पवनी तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी सहा वर्षांची लक्ष्मी जितेंद्र सुखदेवे ही मृत चिमुरडीच नाव आहे. गावावर शोककळा पसरली. रात्री लक्ष्मी नेहमीप्रमाणे आईसोबत जमिनीवर झोपली होती. मध्यरात्री तिला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून ती जागी झाली. तिने आईला उठवलं आणि सांगितलं. आईने बघितलं, तर मुलीच्या उजव्या पायाच्या बोटाजवळ काहीतर चावल्याचं दिसून निदर्शनास आलं.

लक्ष्मीचे वडील जितेंद्र सुखवेदे हे देखील जागे झाले. बघता बघता लक्ष्मीचा पाय काळा पडू लागला होता. तिला सर्पदंश झाल्याची खात्री पटली. म्हणून आईवडिलांनी तिला लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी धडपड केली. चिमुकल्या लक्ष्मीला घेऊन तिचे आईवडील तत्काळ कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं.

अशावेळी तिचा मृत्यू झाला तेव्हा ही घटना ऐकून तिच्या आई वडिलांनी आक्रोश केला. ही बातमी पिंपळगावात पसरली होती. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण पवनी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. अड्याळ ठाण्यात या घटनेप्रकरणी नोंदही करण्यात आलीय. या घटनेनं तिच्या पालकांना मोठा धक्का बसला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *