पाणी पीत असतानाच केला घाव, 9 वर्षीय मुलाची 25 दिवस मृत्यूची झुंज; मन सुन्न करणारी घटना

राजस्थान | काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या जालौर येथे माणुसकीला काळींबा फासणारी आणि तळपायाची आग मस्तकात जाणारी एक विभत्स घटना घडली. एका दलीत मुलाने शाळेत माठातील पाणी पिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.

सुराणा गावातील एका खासगी शाळेत हा भीषण प्रकार घडला. शाळेतील दलीत कुटुंबातील एका विद्यार्थ्याने शाळेत शिक्षकांसाठी असलेल्या माठातील पाणी पिले होते. पाणी पीत असतानाच त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण केली. यात त्या निरागस मुलाला अंतर्गत दुखापती देखील झाल्या. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या पालकांनी खूप धावपळ केली. मात्र २५ दिवस उपचार सुरू असताना त्याची प्राण ज्योत मालवली आहे.

२० जुलै रोजी ही घटना घडली. दलीत कुटुंबातील इंद्र कुमार (९) याचा यात मृत्यू झाला आहे. मारहाण झाल्यावर घटनेची माहिती मिळताच विद्यार्थी इंद्रच्या कुटुंबीयांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. यावेळी त्याच्यावर उपचार करून त्याला ठीक वाटल्यावर घरी पाठवण्यात आले. पहिल्यांदा त्याला घरापासून १३ किलोमिटर लांब पायपीट करत बगोडा येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र घरी आल्यावर त्याला आणखीन त्रास होऊ लागला त्यामुळे पुन्हा एकदा 50 किलोमीटर एवढी पायपीट करत त्याच्या कुटुंबीयांनी त्याला मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हलवले.

इथे उपचार घेऊन पुन्हा एकदा तो घरी आला. त्यानंतर पुन्हा त्याला त्रास होऊ लागला म्हणून घरच्यांनी त्याला आणखीन दूर १५५ किमी अंतर पायी कापत दिसामधील एका रुग्णालयात दाखल केले. मुलाला बर वाटावं म्हणून त्याच्या आई वडिलांनी २५ रुग्णालये पायाखाली घातली. गरीबी असल्याने त्यांना पायी प्रवास करावा लागला. फक्त आणि फक्त त्यांचा मुलगा वाचवा म्हणून त्याचे आई वडील शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र १३ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे आई वडिलांनी मोठा टाहो फोडला आहे.

इंद्र सुराणा गावातील सरस्वती विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी होता. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्याचे काका किशोर कुमार यांनी शाळेचे संचालक छैल सिंग यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवीगाळ करत जातीवाचक शब्द उच्चारत माझ्या पुतण्याला मारहाण करून त्याचा जीव घेतला अशी तक्रार त्यांनी केली आहे. सदर घटनेत पोलिस अजूनही तपासच करत आहेत.

आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी 25 दिवस पायी भटकंती केली. वेगवेगळे गावे पायाखाली घातली. 25 दिवस ते आपल्या मुलाला घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वन वन भटकत होते. या पंचवीस दिवसांमध्ये त्यांनी जवळपास १३५० किलोमीटरचा प्रवास पार केला होता. एवढी मेहनत घेऊनही मुलगा हाताला लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीय फार दुःखी आहेत. इंद्रच्या निधनानंतर आता सगळीकडून संतापाची लाट उसळत आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी त्याचे कुटुंबीय आणि सामान्य माणसं करत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *