साउथच्या स्वॅगमध्ये इंद्राने केली एन्ट्री, दिपू आणि इंद्राचा शुभविवाह सोहळा संपन्न

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये इंद्रा आणि दिपू या दोघांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अशात रविवारी या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अखेर या दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडल्याने चाहते सुखावले आहेत. सर्वांनी या दोघांच्या सुखी संसारासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मालिकेमध्ये दिपू आणि इंद्रा या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीची होती. हृता दुर्गुळेचे लग्न झाले तेव्हा अनेकांनी नाराजी दाखवली होती. प्रेक्षकांना असं वाटत होतं की तिने इंद्राबरोबरच लग्न करावं. प्रेक्षकांच्या मनातली ही इच्छा तिने मालिकेमध्ये पूर्ण केली आहे. सोशल मीडियावरती या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

अशात या दोघांच्या मराठमोळ्या लग्नात साउथ इंडियाचा लूक पाहायला मिळाला. इंद्रा आणि दिपूने यावेळी एका दुचाकी वरून एन्ट्री केली. लग्नाच्या फोटोंमध्ये इंद्राचा लुक खूप व्हायरल होत आहे. तसेच त्याच्या या लूकची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. इंद्राने यावेळी साउथ प्रमाणे लुंगी नेसून लग्नाला हजेरी लावली. त्याचा हा स्वाग सर्वांनाच आवडला आहे.

अशात आता दोघांचा हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मन उडू उडू झाल ही मालिका आता बंद होणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. मन उडू उडू झाल ही मालिका सर्वाधिक टीआरपीची होती. मात्र कलाकारांसमोर असलेले मोठे प्रोजेक्ट लक्षात घेता ही मालिका बंद करण्यात आली आहे.

मालिकेमध्ये दिपू हे पात्र अभिनेत्री हृता दुर्गुळे साकारते. नुकताच तिचा अनन्या हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच प्रेक्षक आता तिच्या आगामी टाइमपास ३ या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *