भारतीय महिला संघाची बाजी, अंतिम सामन्यात श्रीलंकेला 65 रणांनी हरवलं

सिल्हेट | स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात सुरु आहे. यावेळी प्रथम गोलंदाजी करताना भारतीय महिलांनी उत्कृष्ट बोलिगंचं दर्शन घडवलं आहे. भारताने श्रीलंका संघाला अवघ्या 65 धावांमध्ये रोखलं असून ज्यामुळे आता आशिया चषक उंचवण्यासाठी भारताला 20 षटकांत 66 धावांची गरज आहे.

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय महिलांनी त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत सुरुवातीपासून एक-एक श्रीलंकेच्या फलंदाजांना तंबूत धाडायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या संघानं दुहेरी संख्या गाठण्याआधीच त्यांचे 4 फलंदाज तंबूत पोहोचले होते. श्रीलंकेकडून केवळ ओशादी रणसिंघेने 13 आणि इनोका रणवीराने नाबाद 18 धावा केल्यामुले त्यांनी 65 धावांपर्यंत मजल मारली.

भारताला विजयासाठी आता 66 धावांची गरज आहे. भारताच्या महिला गोलंदाजांनी तर उत्तम कामगिरी केली. यावेळी रेणुका सिंहने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर रनआऊट करण्यातही तिने मोलाची कामगिरी केली. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारतीय महिला संघ – शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.

श्रीलंका महिला संघ – चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), हर्षिता मडावी, हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, मलशा शेहानी, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *