भारतीय चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; अनेक मालिकांमध्ये साकारली होती भूमिका

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक मोठी दुःखद बातमी समोर आली आहे. आणखीन एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनय क्षेत्रात सध्या सर्वच ठिकाणी अनेक कलाकार वेगवेगळ्या आजाराने आणि अपघाताने मृत पावत आहेत.

सध्या अभिनेते राजू श्रीवास्तव यांना एम्स रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या बरोबरच अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत.

गाणं कोकिळा लता मंगेशकर यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने देखील संपूर्ण अभिनय विश्वात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी अनेक व्यक्तींनी रडून आक्रोश केला होता.

काही दिवसांपूर्वी दिपेश भान या अभिनेत्याने देखील या जगाचा निरोप घेतला. भाभिजी घर पर है या प्रसिद्ध हिंदी मालिकेत त्यांनी काम केले होते. यात त्यांनी मलखान हे पात्र साकारले होते. क्रिकेट खेळत असताना त्यांना मृत्यूने कवटाळले.

अशात आता आणखीन एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. या अभिनेत्याने हिंदी आणि गुजराती सिनेसृष्टीत आणि मालिका विश्वात काम केले. या अभिनेत्याचे नाव आहे रसिक दवे.

रसिक दवे यांना मूत्रपिंडाचा आजार होता. यासाठी त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र हे उपचार त्यांचे आयुष्य वाचवण्यात सफल ठरू शकले नाही. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

रसिक दवे हे प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांचे पती होते. केतकी यांनी क्युंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत काम केले होते. यातून त्या खूप प्रसिद्ध झाल्या. रसिक दवे यांना गेल्या एक वर्षापासून डायलिसिसवर ठेवले होते. १५ दिवस आधी त्यांची किडनी अधिक खराब झाली त्यांना खूप त्रास होऊ लागला.

त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्थीचे उपचार केले. मात्र २९ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले होते. यात गुजराती अभिनय विश्वात त्यांचा चाहता वर्ग अधिक होता.

मासूम हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी सीआयडी आणि कृष्णा या मालिकांमध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण हिंदी आणि गुजराती कला विश्वात दुःखाची लाट पसरली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *