भारत T20 वर्ल्डकप जिंकू शकत नाही; बड्या खेळाडूची भविष्यवाणी

नवी दिल्ली | वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वास आहे की टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 मध्ये अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. ख्रिस गेलचे हे विधान भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या संधींशी संबंधित आहे. या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल – भारत विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार आहे का, असा प्रश्न ख्रिस गेलला विचारला असता, ख्रिस गेलने दैनिक जागरणला सांगितले की, भारत हा दावेदार आहे, पण ही ट्रॉफी जिंकण्याची शक्यता वेस्ट इंडिजपेक्षा जास्त आहे. यावेळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो, असेही तो म्हणाला. ख्रिस गेलनही हे मान्य करायला मागेपुढे पाहिल नाही की वेस्ट इंडिजच्या संघात कायरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्होसारखे खेळाडू नसतील तर या संघाला काही अडचण येऊ शकते.

खेळपट्टीवरून उसळत्या चेंडूबाबत काय म्हणाला गेल – ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीबद्दल बोलताना सांगितल की, फलंदाज सर्वत्र धावा काढण्याचा मार्ग शोधतात आणि भारतीय फलंदाज अतिरिक्त बाऊन्स खेळपट्ट्यांवरही खेळण्यास सक्षम आहेत. दुसरीकडे, केएल राहुलबद्दल, गेल म्हणाला की तो एक महान फलंदाज आहे आणि एकदा तो सेट झाला की तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठी समस्या बनू शकतो.

निकोलस पूरन हा कर्णधार आहे – विंडीजचा संघ यावेळी निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक खेळणार आहे. गेल, ब्राव्हो आणि रसेलसारखे दिग्गज असूनही या संघात एकापेक्षा जास्त टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू आहेत. संघात फलंदाज, अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांचा चांगला समतोल आहे. मात्र, या संघाला गेल्या वर्षभरात टी-20 क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी करता आलेली नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *