‘बस बाई बस’मध्ये चक्क सुप्रिया ताई लावणार हजेरी, शिंदे पवार या नात्यांचा करणार उलगडा

मुंबई | झी मराठी या वाहिनीवर लवकरच बस बाई बस हा कार्यक्रम सुरू होत आहे. आता पर्यंत इथे फक्त मनोरंजन विश्वातील महिला येणार असं समजलं जातं होतं मात्र या मंचावर देखील राजकीय वर्तुळातील महिला येणार आहेत.

बस बाई बस या कार्यक्रमाचा काही दिवसांपूर्वी एक प्रोमो व्हिडीओ समोर आला होता. यावेळी तिथे आपल्याला रिंकू आणि जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल आलेल्या दिसल्या. अशात आता याच कार्यक्रमाचा आणखीन एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वच जण चकित झाले आहेत. कारण या कार्यक्रमात चक्क सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे.

मुळातच बस बाई बस हा कार्यक्रम महिलांचा आहे. अशात महिलांना जेवण बनवण्यापासून ते राजकारणापर्यंत अनेक मोठे प्रश्न पडतात. त्यामुळे महिला आता सुप्रिया ताईंना नेमके काय काय विचारणार या कडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

बस बाई बस या कार्यक्रमाला अभिनेता सुबोध भावे होस्ट करत आहे. अशात आता मालिकेच्या प्रोमो व्हिडिओमध्ये सुबोध आणि काही गावाकडील वेशभूषेत महील्या बसलेल्या आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे देखील आहेत. यात एक महिला सुप्रिया यांना विचारते की, पवार साहेबांच्या घरामध्ये महिलांचं राज्य चालतं का पुरुषाचं?

आता एवढं विचारून ही महिला गप्प बसत नाही ती पुढे मालमत्ता कुणाच्या नावावर आहे? असं देखील विचारते. यात सुप्रिया सुळे म्हणतात की, ” आमच्या घरी मी खूप चिढवते आता पवार विरुद्ध शिंदे. कारण की, पवार माझे बाबा आणि शिंदे माझ्या आईच्या माहेरच नाव.” तसेच पुढे सुप्रिया ताई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला देखील एक संदेश देताना दिसत आहेत.

आधीच राजकीय वर्तुळात खळबळ सुरू आहे. अशात बस बाई बसमध्ये सुप्रिया ताई आल्याने एक वेगळीच रंगत येणार आहे. हा भाग २९ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना पाहता येईल. आता या मध्ये बायकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता सुप्रिया ताईंना बस बाई बस म्हणावं लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *