‘तू मला सोडून गेलास तर…’ सुख म्हणजे नक्की काय असतं मधील अम्माचां तो व्हिडिओ व्हायरल

पुणे | सुख म्हणजे नक्की काय असतं ही मलिका खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झाली. मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यात गौरी आणि जयदीप या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. या जोडीवर चाहते अतोनात प्रेम करतात. अशात मालिकेतील अम्माचे देखील खूप चाहते आहेत. अम्मा हे पात्र मालिकेत अभिनेत्री आशा ज्ञाते साकारत आहेत.

त्यांनी या पात्राला आपल्या सुंदर अभिनयाने खूप छान साकारले आहे. त्यामुळे चाहत्यांना ही मालिका आणि अम्मा फार आवडते. मालिकेत साधी भोळी दिसणारी ही अम्मा सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय आहे. अभिनेत्री आशा या नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या गोष्टी शेअर करतात.

त्यांनी आता पर्यंत अनेक रील व्हिडिओ देखील बनवलेल्या आहेत. या व्हिडिओ मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यात अम्मने साथीदार आपली साथ सोडून गेल्यावर नेमकं काय करायचं हे सांगितलं आहे. यात त्यांनी दिलेला मजेशीर संदेश जाणून घेऊ.

आशा यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ” तू मला सोडून गेलास तर पडला नाही मला फरक, मागून आलाय दुसरा तू जरा बाजूला सरक.” या व्हिडिओ मध्ये त्या असं म्हणत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्यांनी मालिकेतील अम्मा हे पात्र साकारत असतानाच्या लूकवर शूट केला आहे.

यात त्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी काळ्या रंगाची टिकली लावत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. आजकाल अनेक तरुणी प्रियकराच्या विरहाने मोठे पाऊल उचलतात. मात्र आशा त्यांच्या या मजेशीर व्हिडिओतून मोलाचा संदेश देखील देत आहेत.

आशा यांनी आजवर अनेक मालिकेत अभिनय केला आहे. त्यांची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मलिका मात्र प्रचंड गाजली आहे. या मालिकेमुळे त्यांना प्रेक्षकांची खास पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aasha Dnyate (@aashagopal_)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *