वहिदा रहमान आणि नर्गिस दत्त यांच्यामध्ये बसलेल्या या चिमुकलीला ओळखून दाखवा…!

मुंबई| सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यावर दररोज वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. वायरल होत असलेल्या फोटोंमध्ये कलाकारांचे फोटो जास्त करून पाहायला मिळतात. कलाकारांच्या आयुष्यातील अनेक खाजगी गोष्टी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. तसेच आता हा फोटो आणि यात असलेल्या एका लहान मुलीची ओळख पटवून देण्याचे चॅलेंज सुरू झाले आहे. तुम्ही देखील हे चॅलेंज स्वीकारा आणि या मुलीची ओळख पटवून सांगा.

जर तुम्हाला तिला ओळखता येत नसेल तर तुम्हाला एक हिंट देतो. या मुलीचे आई आणि वडील दोघेही हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार राहिले आहेत. तसेच तिचा भाऊ आजही अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करतो आहे. सदर ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये दोन अभिनेत्री आहेत. वहिदा रहमान आणि नर्गिस दत्त या दोन्ही अभिनेत्री एका कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत बसलेल्या दिसत आहेत. कार्यक्रमात काहीतरी मजेशीर गोष्ट सुरू आहे. त्यामुळे दोघींच्या चेहऱ्यावर मोठे हास्य दिसत आहे. या दोघींच्या या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये एक चिमुकली देखील आहे. ही छोटी मुलगी नेमकी कोण आहे याचाच सर्वजण शोध घेत आहेत.

वहिदा रहमान आणि नर्गिस दत्त या दोघींची नावे घेतल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की ही चिमुकली या दोघींपैकीच कुणाची तरी मुलगी असावी. दिलेल्या हिंट वरून तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल की ही नर्गिस दत्त यांची मुलगी नम्रता दत्त आहे. नम्रताची आई नर्गिस दत्त यांनी त्यांच्या कारकीर्दीत बॉलीवूडमध्ये धडाकेबाज अभिनय केला. सुनील दत्त यांनी देखील त्याकाळी इंडस्ट्री खूप गाजवली होती. तसेच भाऊ संजय दत्त हा आज देखील बॉलीवूड दयानंद सोडताना दिसत आहे. आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींमुळे संजय नेहमीच चर्चेत राहिला आहे.

 

नम्रता दत्त चा हा बालपणीचा फोटो बॉम्बे बसंती नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ” नम्रता दत्त, नर्गिस आणि संजय दत्त यांच्याबरोबर वहिदा रहमान, मुंबईतील शमशाद बेगम नाईटमध्ये सहभागी झालेले असताना, १९७०” दिलेल्या कॅप्शन वरून समजते की, या दोन्हीही अभिनेत्री नम्रता दत्त बरोबर शमशाद बेगम नाईट या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. इथे आल्यावर त्यांनी खूप मजा मस्ती केली. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि नम्रताचा निरागसपणा पाहून अनेकजण या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *